Saturday, April 20, 2024

गोरा रंग नसल्याने ‘या’ अभिनेत्रीला केले होते रिजेक्ट, निर्माते विचारायचे, ‘नोकरानीच्या रोलसाठी आलीस का?’

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अनेक अभिनेत्री राज्य करतात. परंतु यशाच्या मखमली गालिच्यावर पोहोचण्याआधी त्यांना काटेरी वाट पार करावी लागते. वाटेत त्यांना त्यांच्या रंगावरून, त्यांच्या फिगरवरून नावं ठेवली जातात. परंतु या सर्वांमुळे हताश न होता जी धीराने सर्वांना सामोरी जाते, तीच अभिनेत्री पुढे जाऊन यशस्वी होते. असाच प्रवास ‘नादान परिंदे घर आजा’ फेम अभिनेत्री गुलकी जोशीच्या वाटेला देखील आला होता.

अभिनेत्री गुलकी जोशीने तिला सहन कराव्या लागलेल्या कठीण काळाबद्दल सांगितले आहे. तिने कला विश्वातील राजकारणावर देखील भाष्य केले. तिच्या वाटेला देखील अनेक वाईट अनुभव आलेले आहेत. दिगदर्शक तिला तिच्या रंगावरून तसेच अन्य काही गोष्टींवरून हिनवायचे. काही दिवसांपूर्वी तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सगळ्याची पोलखोल केली आहे.

https://www.instagram.com/p/CUBzusdq4I6/?utm_source=ig_web_copy_link

असे टोमणे ऐकावे मारायचे अभिनेत्रीला
मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, “एक काळ होता जेव्हा टीव्ही शोच्या निर्मात्यांना गोऱ्या चिकण्या मुलीचं अभिनयासाठी हव्या होत्या, तेव्हा देवाच्या कृपेने मी हे सगळं पार करू शकले. कारण देवाने मला तेवढी कला आणि बुद्धी दिली आहे. अनेकवेळा माझी निवड करताना मला निर्माते म्हणायचे की, तू या पात्रासाठी तेवढी चांगली नाही दिसत, पण तू चांगला अभिनय करते म्हणून आम्ही तुझी निवड करत आहोत. मला माहित नाही हे माझे कौतुक होते की अपमान, पण माझ्याबरोबर असे घडले आहे.”

नोकरानीचे काम करायला सांगायचे
पुढे ती सांगते की, “मी मालिकेच्या मुख्य पात्रासाठी ऑडिशन दयायला जायचे, तेव्हा मला तेथील निर्माते म्हणायचे, अच्छा तू नोकरानीच्या पात्रासाठी आली आहेस? मी त्यांना समजवायचे नाही मी मुख्य अभिनेत्रीसाठी आले आहे. परंतु त्यावेळी माझे कुणीच ऐकायचे नाही. असो मी त्यावेळी त्यांना काही बोलू शकत नव्हते. कारण असे सर्व खूप वर्षांपासून चालत आलेले आहे.”

https://www.instagram.com/p/CTFDH2Ts7NY/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्रीने आज तिच्या अभिनयाने स्वतःची मोठी ओळख बनवलेली आहे. आपल्या मार्गातील सर्व अडचणींना तिने मागे टाकले आहे. आतापर्यंत गुलकी जोशीने ‘श्री कृष्णा’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘नादान परिंदे घर आजा’, ‘पिया रंगरेज’, ‘एक श्रृंगार-स्वाभिमान’ अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम

-लग्नानंतर प्रथमच बिकिनीमध्ये दिसली दिशा परमार; मालदीवमध्ये पती राहुलसह करतेय सुट्ट्या एन्जॉय

-‘मनिके मागे हिते’ गाण्याची लोकप्रियता पोहचली शिगेला; इंग्रजी, हिंदी, तामिळ अन् आता भोजपुरी व्हर्जनही झालं रिलीझ

हे देखील वाचा