Thursday, March 28, 2024

अलिशा चिनाईने बॉलिवूडला दिलीत अनेक हिट गाणी, अनु मलिक यांच्यावर लावले होते गंभीर आरोप

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका अलिशा चिनॉय (Alisha Chinai) हिने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त अनेक अल्बमसाठीही आवाज दिला आहे. याच कारणामुळे तिला ‘क्वीन ऑफ इंडियापॉप’ असेही म्हटले जाते. १९८५ मध्ये तिने गायनाला सुरुवात केली. तिचे ‘मेड इन इंडिया’ गाणे आजही चाहत्यांना खूप आवडत. अलिशा चिनॉय शुक्रवारी (१७ मार्च ) तिचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.

बप्पी लाहिरी यांनी चित्रपटात गाण्याची दिली संधी
अलिशा चिनॉयचे (Alisha Chinai) खरे नाव सुजाता चिनॉय आहे. ती अहमदाबादची रहिवासी आहे. आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायीकेला बप्पी लाहिरी यांनी पहिल्यांदाच चित्रपटात गाण्याची संधी दिली. या जोडीने ‘ऍडव्हेंचर ऑफ टारझन’, ‘डान्स-डान्स’, ‘कमांडो’, ‘गुरू’ आणि ‘लव लव लव’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र अनेक हिट गाणी दिली.

अनेक मोठ्या अभिनेत्रींसाठी गाणी गायली
अलीशा चिनॉय हिची गणना बॉलिवूडमधील प्रतिभावान गायकांमध्ये केली जाते. अनेक नामवंत अभिनेत्रींना तिने आपला आवाज दिला आहे. यामध्ये करिश्मा कपूर, स्मिता पाटील, मंदाकिनी, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.

अनु मलिक यांच्यावर केले होते गंभीर आरोप
अलीशाने आतापर्यंत अनेक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. ९० च्या दशकात एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे अनु मलिक हे देखील त्यापैकीच एक होते. या गायक-संगीत दिग्दर्शक जोडीने अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत. पण एक काळ असा होता की, दोघांमध्ये वाद व्हायचा. खरं तर, ‘मेड इन इंडिया’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी तिने अनु मलिक यांच्यावर तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. हे गाण्याच्या प्रमोशनसाठी करण्यात आल्याचा दावा काही लोकांनी केला.

‘हे’ गाणे ठरले करिअरचा टर्निंग पॉइंट
अलिशाने गायिका म्हणून अनेक हृदयस्पर्शी गाणी गायली आहेत. त्यांच्याकडे ९० च्या दशकातील अनेक हिट गाणी आहेत. जी आजही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. पण काही काळानंतर नवीन गायकांच्या आगमनामुळे तिला कमी गाणी मिळू लागली. मात्र, तिने हार मानली नाही आणि चित्रपटसृष्टीत पुन्हा दमदार पुनरागमन केले. ‘कजरा रे’ हे तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे गाणे आहे. २००५ मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’ मधील या गाण्याने त्याने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले. हे गाणे आजही पार्ट्यांमध्ये वाजवले जाते.

लग्नाच्या आठ वर्षांनी घेतला घटस्फोट
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तिने १९८६ मध्ये तिचे मॅनेजर राजेश झवेरी यांच्याशी लग्न केले. परंतु हे लग्न केवळ आठ वर्षे टिकले. १९९४ मध्ये दोघे वेगळे झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा