आपल्या देशात संगीत ही एक साधना आणि गाणं हा एक धर्म आहे. बॉलिवूडच्या या जगतात चित्रपट जरी एकसारख्या विषयांवर बनत असले तरी संगीताने आणि गाण्यांनी त्यांचे वेगळेपण नक्कीच टिकवले आहे. चित्रपटांमधील गाणी लोकांच्या मनाला शांती देतात. मात्र या गाण्यांना अधिक प्रभावी पद्धतीने आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम गायिका, गायक करतात. मनोरंजनविश्वात अनेक उत्तम गायक आणि गायिका आहेत ज्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने सर्वांनाच भुरळ पाडली. बॉलिवूडमधील अशीच एक उत्तम आवाजाची गायिका म्हणजे मोनाली ठाकूर. मोनालीने तिच्या शांत आणि मधुर आवाजाने उत्तम गायिका अशी ओळख मिळवली. संगीताच्याच परिवारातून आलेल्या मोनालीने यश मिळवण्यासाठी खूप कठीण संघर्ष केला. आज मोनाली तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.
मोनालीचा जन्म ३ नोव्हेंबर १९८५ रोजी पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये झाला. तिचे वडील हकती ठाकूर आणि बहीण मेहूली ठाकूर बंगाली फिल्म इंडस्ट्रीमधील गायक क्षेत्रातील मोठे नावं. संगीताचा वारसा घरातून मिळालेल्या मोनालीने खूप कमी वयातच गाणं शिकायला सुरुवात केली. तिचे वडील आणि बहीण जरी प्रसिद्ध आणि नावाजलेले संगीतकार आणि गायिका असूनही तिला तिचे नावं कमावण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.
मोनालीने लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा टेलिव्हिजनवरील इंडियन आयडलच्या दुसऱ्या पर्वात सहभाग घेतला, आणि तिच्या संघर्षाला सुरुवात झाली. या शोमधून ती एलिमिनेट झाली. त्यानंतर तिने काम मिळवण्यासाठी खूप धडपड केली. तेव्हा तिला २००८ साली संगीतकार प्रीतमने ‘रेस’ सिनेमातील दोन गाणी गाण्याची संधी दिली. ही दोन गाणी होती, ‘जरा जरा टच मी’, ‘ख्वाब देखे’. दोन्ही गाणी सुपरहिट झाली आणि मोनाली एका रात्रीत स्टार बनली.
त्यानंतर मोनालीने हिंदी आणि बंगालीमध्ये अनेक हिट गाणी गायली. तिच्या हिट गाण्यांमध्ये ‘ख्वाब देखें झूठे मूठे’, ‘जरा-जरा टच मी’, ‘रघुपति राघव’, ‘हिप-हॉप पम्मी’,’जिंगल-जिंगल’, ‘अंजाना-अंजानी की कहानी’, ‘मोह मोह के धागे’, ‘ढोल बाजे’, ‘लव में थोड़ा’, ‘छम छम’, ‘सवार लूं’, ‘अग बाई’ आदी अनेक गाण्यांचा समावेश होतो.
मोनाली तिच्या गाण्यांसोबतच तिच्या या इंडस्ट्रीबद्दलच्या खुलाशामुळे देखील प्रकाशझोतात आली होती. एका मुलाखतीमध्ये तिने इंडस्ट्रीबद्दल सांगितले, “आपल्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात माफियागिरी आहे. कोणालाही त्याच्या नावाचे क्रेडिट मिळत नाही. आणि म्हणूनच मला ही इंडस्ट्री अजिबात आवडत नाही. आता मी चित्रपटांमध्ये गाणे गाण्याचे प्रयत्न नाही करत. मी स्वतःला यासर्वांपासुन खूप दूर केले आहे. आता मी माझ्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे.”
पुढे मोनालीने हे देखील सांगितले की, “या क्षेत्रात असे लोकं आहेत जे प्रतिभावान लोकांना मुंग्यांसारखे ठेचून मारतात. या क्षेत्रात या गोष्टी खूप घाणेरड्या आहेत. मला नाही माहित या सर्व गोष्टी कधी संपतील मात्र आता या क्षेत्राला मोठ्या क्रांतीची गरज आहे.”
मनालीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास तिने २०१७ साली तिचा बॉयफ्रेंड असलेल्या माइक रिचरशी लग्न केले. तिने तिचे लग्न तीन वर्ष सर्वांपासून लपवून ठेवले होते. त्यानंतर जून २०२० मध्ये तिने तिचे लग्न झाल्याचे जाहीर केले. माइक रिचर हा मूळचा स्विट्जरलँड आहे. मोनालीला तिच्या गाण्यांसाठी वेगवेगळ्या मोठ्या पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिला २०१६ साली आलेल्या दम लागा के हैशा सिनेमातील ‘मोह मोह के धागे’ गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले गेले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जांभळ्या रंगाची साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर; तेजश्री प्रधानचा दिवाळी लूक पाहून चाहतेही फिदा
-‘रमाची खूप आठवण येतीये,’ म्हणत जितेंद्र जोशीने सांगितल्या त्याच्या आजीसोबतच्या गोड आठवणी
-वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास










