Saturday, September 7, 2024
Home कॅलेंडर राजेश खट्टर यांनी हॉलिवूडच्या अभिनेत्यांना दिलाय स्वतःचा आवाज; तर शाहिद कपूरसोबत आहे ‘हे’ जवळचे नाते

राजेश खट्टर यांनी हॉलिवूडच्या अभिनेत्यांना दिलाय स्वतःचा आवाज; तर शाहिद कपूरसोबत आहे ‘हे’ जवळचे नाते

बॉलिवूडमध्ये अनेक हॉलिवूडचे डब केलेले चित्रपट तुम्ही पाहिले असतील. या चित्रपटांमध्ये हॉलिवूडचे कलाकार हिंदीमध्ये डायलॉग बोलत नाहीत. मग हिंदीमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने या चित्रपटांचे डायलॉग नेमकं कोण बोलत आहे? असा प्रश्न आजवर अनेकांना पडला असेल. अशात तुम्ही सर्वांनी हॉलिवूडचे ‘अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’ आणि ‘अव्हेंजर्स ऐन्डगेम’ हे दोन चित्रपट तर हमखास पाहिले असतील. या व अशा अनेक हॉलिवूड चित्रपटांना आपला आवाज देणारे दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेते राजेश खट्टर आहेत. बॉलिवूड, टॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे राजेश शुक्रवारी (२४ सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ त्यांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास.

राजेश यांनी आजवर हॉलिवूडमध्ये हिंदी व्हॉइस आर्टिस्ट म्हणून खूप नाव कमावले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत हिंदी मालिकांसह, चित्रपट आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ते एक उत्कृष्ट व्हॉइस आर्टिस्ट आणि स्क्रीन लेखक आहेत. त्यांचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. कारण त्यांनी अनेक इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. (Happy Birthday Rajesh Khattar hindi voice dubbed from Hollywood to Bollywood)

हिंदी चित्रपटांमधील आणि मालिकांमधील कारकीर्द
राजेश खट्टर यांनी साल १९९२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘नागिन और लूटेरे’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘डॉन’, ‘डॉन २’, ‘खिलाडी ७८६’, ‘रेस २’ सतीश कौशिक दिग्दर्शित ‘गँग ऑफ गोस्ट्स’, ‘मंजुनाथ’ आणि ‘ट्रॅफिक’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘सूर्यवंशम’मध्ये देखील त्यांनी दमदार कामगिरी केली. त्यानंतर त्यांनी साल १९९८ मध्ये ‘फिर वही तलाश’ या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यांनी ‘जुनून’, ‘आहट’, ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’ आणि ‘सपना बाबुल का… बिदाई’, ‘लेफ्ट राईट लेफ्ट’, ‘क्या कसूर है आलम का’, ‘बेहद’, ‘बेपनाह’ या मालिकांमध्ये काम केले. तसेच त्यांनी सोनी टीव्ही वरील ‘क्राईम पेट्रोल’ मध्ये देखील काम केले आहे. त्यांनी जर्मन भाषिक टीव्ही शो ‘गिफ्ट’, फ्रेंच टीवी शो ‘फइस पास सी’, ‘फाइस पास सा’ आणि इंग्रजी भाषिक टीव्ही शो ‘शार्प्स पेरिल’ आणि ‘स्पॉटलाइट ‘यांमध्ये देखील दमदार कामगिरी केली.

हॉलिवूडमधील कारकीर्द
राजेश यांना आपल्या देशातील नंबर एकचे व्हॉइस आर्टिस्ट म्हणून ओळखले जाते. त्यांच्या आवाजाची किमया त्यांनी इंग्रजी चित्रपटांमध्ये देखील दाखवली आहे. त्यांनी आतापर्यंत ‘टॉम हैंक्स’, ‘जॉनी डेप’, ‘जैक ब्लैक’, ‘रॉबर्ट डाउनी जूनियर’, ‘डोमिनिक वेस्ट’, ‘निकोलस केज’, ‘लैम्बर्ट विल्सन’ आणि ‘माइकल फेसबेंडर’ सह अनेक कलाकारांना आपला आवाज दिला आहे. त्यांनी ‘होम अलोन ३’, ‘द मास्क ऑफ झिरो’, ‘ग्रे स्वसोन’, ‘ब्लॅक अँडरसन’, ‘बिल हेडर’ यासह हॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शाहिद कपूरसोबत आहे ‘हे’ जवळचे नाते
राजेश खट्टर हे शाहिद कपूरचे सावत्र वडील आहेत. त्यांनी साल १९९० मध्ये शाहिदची आई नीलिमा यांच्याशी विवाह केला होता. नीलिमा यांनी पहिल्या पतीकडून शाहिदला जन्म दिला होता. राजेश यांच्याशी देखील पटत नसल्याने त्यांनी ११ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. त्यानंतर राजेश यांनी साल २००८ मध्ये वंदना सजनानी यांच्याशी विवाह केला. साल २०१९ त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचे नाव वनराज खट्टर असे आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigger Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब

-अनोख्या फॅशन सेन्समुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, व्हायरल फोटोवर ट्रोलर्सचा निशाणा

-जेव्हा अक्षय कुमारवर झाला होता जीवघेणा हल्ला; आवाज जरी केला, तर झाडल्या गेल्या असत्या गोळ्या

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा