Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड ‘उतरन’ मालिकेतून ‘तिला’ मिळाली ओळख; सहकलाकारासोबत केले लग्न अन् ६ वर्षातच घेतला घटस्फोट

‘उतरन’ मालिकेतून ‘तिला’ मिळाली ओळख; सहकलाकारासोबत केले लग्न अन् ६ वर्षातच घेतला घटस्फोट

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात घर करणाऱ्या अनेक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची लोकप्रियता ही देशभरात आहे. यामध्ये रश्मी देसाई या अभिनेत्रीचाही समावेश आहे. रश्मी केवळ छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री नसून ती भोजपूरी सिनेमातही चांगलीच प्रसिद्ध आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी रश्मी भोजपुरी, मणिपुरी, आसामी आणि बंगाली या सिनेमांचाही भाग राहिली आहे. याव्यतिरिक्त रश्मीने बिग बॉस १३ मध्येही सहभाग घेतला होता. ती आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या या वाढदिवसानिमित्त तिच्या कारकीर्दीवर टाकलेली एक नजर…

शाहरुख खानच्या सिनेमात केले काम
रश्मीचा जन्म १३ फेब्रुवारी १९८६ रोजी आसामच्या नागावमध्ये झाला होता. सन २००४ मध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि रवीना टंडनचा ‘ये लम्हें जुदाई के’ सिनेमात रश्मीने काम केले होते. त्यानंतर तिने हिंदी टीव्ही जगतातील अभिनय कारकीर्दीची सुरुवात सन २००६ साली ‘रावण’ या मालिकेतून केली होती. असे असले तरीही रश्मीला खरी ओळख मिळाली ती, ‘उतरन’ या मालिकेतून. याव्यतिरिक्त तिने ‘परी हूँ मैं’, ‘श्श्शश… फिर कोई है’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘जरा नचके दिखा’, ‘क्राईम पेट्रोल’, ‘खतरों के खिलाडी’, ‘अधूरी कहानी हमारी’, ‘इश्क का रंग सफेद’, ‘नच बलिए’ आणि ‘झलक दिखला जा’ या मालिकांमध्येही काम केले आहे.

सहा वर्षांमध्येच घेतला घटस्फोट
रश्मीने सन २०१२ मध्ये आपला सहकलाकार नंदीश संधूसोबत लग्न केले होते. नंदीश आणि रश्मी ‘उतरन’मध्ये एकसोबत दिसले होते. लग्नाच्या एका वर्षानंतर दोघांमधील संबंध बिघडू लागले आणि सहा वर्षांमध्येच त्यांनी घटस्फोट घेतला होता. एका मुलाखतीत रश्मीने सांगितले होते की, “प्रेमात पडणे आणि नंदीशसोबत लग्न करणे हा निर्णय माझाच होता. तरीही काही वर्षांनंतर आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे झालो. तो काळ खूपच तणावपूर्ण होता.”

रश्मीने पुढे सांगितले होते की, “घटस्फोटानंतर ती डिप्रेशनमध्ये होती. घटस्फोट कधीही घ्यायचा नव्हता आणि आपले नाते वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. परंतु काळानुसार हळूहळू परिस्थिती खराब होऊ लागली.” रश्मीने मुलाखतीत शारीरिक शोषणाचाही उल्लेख केला होता. ती म्हणाली होती की, “जर आमचे विचार जुळत नसतील, तर वेगळे होणेच चांगले आहे. स्वत:च्या आदरासाठी असे करणे गरजेचे आहे. शारीरिक शोषणाच्या ६ वर्षांनंतर मी त्याच्याकडून घटस्फोट घेतला होता.”

इतर चित्रपटांमध्येही केले काम
यापूर्वी तिने भोजपुरी, गुजराती आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते. तिने काम केलेल्या भोजपुरी चित्रपटांमध्ये ‘गजब भइल रामा’, ‘कब होए गौना हमार’, ‘नदिया के तीर’, ‘गब्बर सिंग’, ‘तोहसा प्यार बा’, ‘दुल्हा बाबू’, ‘बंधन टूटे न’, ‘पप्पू के प्यार हो गईल’ यांचा समावेश आहे.

बिग बॉस विजेत्याशी भांडण करून आली होती चर्चेत
अभिनेत्री रश्मी मागील वर्षी बिग बॉसच्या १३ व्या हंगामाचा विजेता सिद्धार्थ शुक्लासोबत झालेल्या भांडणामुळे चांगलीच चर्चेत आली होती.

शेअर केला व्हिडिओ
रश्मी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

ती नेहमीच आपले फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. आज ती आपल्या वाढदिवसाचा आनंद लुटत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा