Friday, April 19, 2024

शर्मिलांच्या आधी सिमी यांनी केलं होतं मन्सूर अली खान पतौडींना डेट, तर ‘या’मुळे घालतात पांढऱ्या रंगाचे कपडे

बॉलिवूडची ‘द लेडी इन व्हाईट’ अभिनेत्री सिमी गरेवाल या एक यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी सत्यजित रे, राज कपूर, शशी कपूर सारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्या आपल्या चॅट शोसाठी देखील प्रसिद्ध आहेत. बॉलिवूडचे एक अनोखे व्यक्तिमत्व, ज्यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. सिमी गरेवाल रविवारी (१७ ऑक्टोबर) आपला ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज आपण त्यांच्या वाढदिसानिमित्त त्यांच्याशी संबंधित काही रोचक किस्से पाहूया.

ब्रिटनमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या सिमी यांच्या मनामध्ये चित्रपटांसाठी नेहमीच विशेष स्थान होते. त्यांच्या आई- वडिलांनी त्यांना बॉलिवूडमध्ये येण्याची परवानगी द्यावी म्हणून त्यांनी उपोषण देखील केले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, सिमी या एका श्रीमंत कुटुंबातील आहेत. त्या इंग्लंडमध्ये वाढल्या आणि त्याच शाळेत शिकल्या. त्यांच्या वडिलांना अनेक भाषा अवगत होत्या. सिमी यांचे आई-वडिल मित्रांसोबत पोलो मॅचचा आनंद लुटण्यात दिवस घालवायचे. त्या त्यांची एकुलती एक बहीण अमृताच्या खूप जवळ आहेत.

सिमी यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४७ रोजी लुधियाना येथे एका शीख कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांचे कुटुंब इंग्लंडला गेले आणि वयाच्या १५ व्या वर्षी भारतात परतले. परदेशातून इंग्रजीमध्ये पारंगत असल्याने त्यांना ‘टार्झन गोज टू इंडिया’ चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली आणि याच बरोबर त्यांची बॉलिवूड कारकीर्द सुरू झाली. त्यांनी अनेक मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केले आहे.

सिमी गरेवाल नेहमी पांढऱ्या ड्रेसमध्ये पार्टीत जातात
सिमी नेहमी पांढऱ्या पोशाखात दिसल्या आहेत. मग ती साधी पांढरी शिफॉन साडी असो किंवा मोत्याचा हार असलेला पांढरा पॅन्टसूट. त्यांनी एकदा माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “मला पांढरा रंग आवडतो. मी लहान असल्यापासून माझ्या पार्टीचे कपडे पांढरे होते. जेव्हा मी पांढरे कपडे घालते, तेव्हा मला खूप आनंद होतो. जर मी वेगळ्या रंगाच्या ड्रेसकडे आकर्षित झाले, तर मी ते विकत घेते, पण ते माझ्या कपाटात राहतात.”

सिमी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. ज्यात त्यांच्या पहिल्या गंभीर नात्याचा समावेश आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, जेव्हा त्या १७ वर्षांची होत्या, तेव्हा त्यांचे जामनगरच्या तत्कालीन महाराजाशी प्रेमसंबंध होते. नंतर, त्यांनी मन्सूर अली खान पतौडीसोबत नातेसंबंध असल्याचे उघड केले. तेव्हा मन्सूर अली खान पतौडींच्या आयुष्यात शर्मिला टागोर आल्या नव्हत्या. अभिनेत्री लग्न जुनी दिल्लीच्या चुनमल कुटुंबातील रवी मोहनशी झाले होते. हे लग्न थोड्या काळासाठीच टिकले.

जेव्हा सिमी यांना त्यांचे लग्न मोडण्यामागचे कारण विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, “आम्ही दोघेही एकमेकांशी एकनिष्ठ होतो, रविमोहन खरोखर खूप चांगला माणूस होता. कदाचित देवाने आम्हा दोघांना एकमेकांसाठी बनवले नाही.”

‘या’ कलाकारांसोबत जोडले गेले होते नाव
आयुष्याच्या टप्प्यात त्यांचे नाव कधी राज कपूर आणि कधी मनमोहन देसाई यांच्याशी जोडले गेले होते. सिमी यांनी सुभाष घईच्या ‘कर्ज’ चित्रपटांनंतर बॉलिवूड जग सोडले आणि छोट्या पडद्यावर होस्ट म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा

-रणवीर सिंगने फॅमिली प्लॅनिंगबद्दल केला खुलासा; म्हणाला, ‘आम्हालाही दोन…’

-…आणि मरण्यापुर्वी स्मिता पाटील यांनी सांगितली होती ‘ती’ अनोखी शेवटची इच्छा.! काय होती ती इच्छा!

हे देखील वाचा