Da-bangg कॉन्सर्टमधून हटवले जॅकलिनचे नाव? सलमान खानने केले मोठे वक्तव्य


अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबाबत (Jacqueline Fernandez) आजकाल अनेक चर्चा चालू आहेत. तिचे नाव जेव्हा २०० कोटींच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात आले आहे, तेव्हापासून ईडीकडून तिची चौकशी चालू आहे. याचा परिणाम तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर होत आहे. जॅकलिनबाबत अशी माहिती समोर आली होती की, ती रियादमध्ये जाणाऱ्या da-bangg कॉन्सर्टमध्ये सामील होणार नाही. ती यात सामील न होण्यामागील कारणाने सस्पेन्स तयार झाला होता. अशातच सलमान खानने (Salman Khan) याबाबत उत्तर दिले आहे. त्याचे उत्तर महत्वाचे आहे, कारण तो या कॉन्सर्टमधील महत्वाचा भाग आहे.

मागील काही दिवसांपासून अशी बातमी येत होती की, मनी लॉड्रिग प्रकरणानंतर जॅकलिनची जागा डेझी शाह रियादमध्ये होणाऱ्या दबंग कॉन्सर्टचा भाग असणार नाही. आता या सगळ्या अफवांवर सलमान खानने उत्तर दिले आहे. सलमानने सांगितले आहे की, जॅकलिनच्या जागी इतर कोणतीही अभिनेत्री घेतली जाणार नाही. तसेच जॅकलिन या कॉन्सर्टमध्ये भाग घेण्याची शक्यता आहे. सलमान ने सांगितले की, “ती नसेल तर मी स्वतः जॅकलिन बनून परफॉर्मन्स करेल.” (Suspense raised by Jacqueline Fernandez participation in da-banagg concert salman khan said this)

सलमान आणि जॅकलिनची मैत्री तर सगळ्यांना माहित आहे. लॉकडाऊन असताना जॅकलिन सलमानच्या फार्म हाऊसवर अनेक दिवस राहिली होती. तो नेहमीच जॅकलिनला सपोर्ट करत असतो. यावेळी देखील तिच्या कॉन्सर्टमधून नाव हटवले आहे, यासाठी सलमानने नकार दिला आहे. त्याच्या म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की, जर सगळे काही ठीक झाले, तर ती नक्कीच या इव्हेंटमध्ये सामील होईल. काही दिवसापूर्वी ईडीने तिला मुंबई विमान तळावर थांबवले होते.

सलमानने मागील काही दिवसांपूर्वी त्याचा ‘अंतिम : द फायनल त्रूथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सांगितले होते की, १० डिसेंबर रोजी हा इव्हेंट सुरू होणार आहे. ज्याचे नाव da-bangg असे आहे. यामध्ये अनेक कलाकार सामील होणार आहेत. यात शिल्पा शेट्टी, सई मांजरेकर, प्रभू देवा, सुनील ग्रोवर, कमाल खान आणि गुरू रंधावा यांसारख्या कलाकारांचा समावेश असणार आहे.

अधिक वाचा –


Latest Post

error: Content is protected !!