प्रेमाच्या अथांग सागरात बुडालेल्या ‘या’ जोडप्याची प्रेम कहाणी, अखेर अधुरीच राहिली


चित्रपटसृष्टीत जोपर्यंत ‘प्रेम’ या नावाचा उल्लेख राहील तोपर्यंत सिनेसृष्टीतील दिलीप कुमार आणि मधुबाला हे नाव प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहील. दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं नाव चित्रपट सृष्टीतील त्या प्रेम कहाण्यांमध्ये येते, ज्या पूर्ण झाल्या नव्हत्या.

दिलीप कुमार आणि मधुबाला हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. परंतु मधुबालाच्या वडिलांमुळे त्यांची ही प्रेमकहाणी अपूर्ण राहिली. या व्हॅलेंटाईन वीकमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत. मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेम कहाणीबद्दल. ज्या कहाणीचे विल्हन स्वत: हीरोइनचे वडील होते. त्यामुळे त्यांची ही कहाणी पूर्ण नाही होऊ शकली आणि दोघांचेही आयुष्य वेगळे झाले.

सन 1944 मध्ये ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाच्या सेटवर मधुबाला आणि दिलीप यांची पहिली भेट झाली. त्यानंतर 1951 मध्ये ‘तरणा’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यात ते दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आले. जेव्हा त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली, तेव्हा मधुबाला अगदी 18 वर्षांची होती आणि दिलीप कुमार हे 29 वर्षांचे होते. त्यानंतर 7 वर्ष ते रिलेशनमध्ये होते. परंतु मधुबालाचे वडील अत्ताउल्लाह यांना दिलीप कुमार सोबतचं मधुबालाचं नातं मान्य नव्हतं. त्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. त्यामुळे त्या दोघांच्या प्रेम कहाणीचा तिथेच अंत झाला.

‘मुगल ए अजम’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान दिलीप आणि मधुबाला यांचं प्रेम अजूनच वाढल. परंतु काही वर्ष चाललेल्या या शूटिंगमध्ये दिलीप आणि मधुबाला यांच्यामध्ये काही गैरसमज निर्माण झाले आणि त्यामुळे त्या दोघांच्या प्रेमाचा अंत झाला. त्यावेळी परिस्थिती अशी होती की, जरी दिलीप आणि मधुबाला ऑनस्क्रीन एकमेकांवर प्रेम करत होते. परंतु ते तसं एकमेकांशी बोलत देखील नव्हते. खरंतर ‘बी आर चोपडा’ यांनी मधुबालाचे वडील अत्ताअल्लाह खान यांच्यावर एका चित्रपटाचे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण नाही केले म्हणून केस केली होती. त्यावेळेस दिलीप आणि मधुबाला यांचं नाते देखील सगळ्यांसमोर उघडकीस आले. परंतु तेव्हा दिलीप मधुबाला सोबत बोलत देखील नसायचे. त्यावेळेस ते दोघे सलीम आणि अनारकली यांचं पात्र निभावत होते.

मधुबाला सोबतच्या आपल्या नात्याचा स्वीकार दिलीप यांनी त्यांच्या बॉयोग्राफीमध्ये सविस्तर केला आहे. मधुबालाचे वडील एक प्रोडक्शन कंपनी चालवत होते. ते अस म्हणत होते की, लग्नानंतर मधुबाला आणि दिलीप यांनी त्या प्रॉडक्शन हाऊसमध्येच काम केले पाहिजे. दिलीप कुमार यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. त्यांनी त्या गोष्टीसाठी नकार दिला. तिथूनच दिलीप कुमार आणि मधुबाला हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. त्या दोघांनी चालू असणाऱ्या चित्रपटात काम केले परंतु तो चित्रपट पूर्ण झाल्यावर ते दोघे एकमेकांसाठी परके झाले. दिलीप कुमार हे त्यांच्या बायोग्राफीमध्ये असे लिहितात की, “मुगल -ए- आझम’ या चित्रपटानंतर आम्ही दोघे एकमेकांपासून लांब झालो. त्यानंतर दिलीप कुमार यांनी सायरा बानो आणि मधुबालाने किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ
-‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनीपासून ते करीना कपूरपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी केलंय विवाहित पुरुषांशी लग्न; वाचा कोणाकोणाचा आहे समावेश
-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते
-‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात
-द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?


Leave A Reply

Your email address will not be published.