‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात

People Asked Help To Sonu Sood For Catch Monkey And Send In Forest


बॉलिवूडमधील सर्वांचा लाडका अभिनेता सोनू सूद आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त गोरगरिबांची मदत करण्यासाठीही ओळखला जातो. तो नेहमीच त्याच्या कामांमुळे चर्चेचा विषय ठरत असतो. लॉकडाऊनमध्ये लोकांची मदत करण्याचे काम त्याने आतापर्यंत सुरू ठेवले आहे. त्यामुळे कोणालाही समस्या असेल, तर गरजू व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याकडे मदत मागतात. तसेच सोनू सूदही मदतीसाठी नेहमीच तयार असतो. अशातच आता एका चाहत्याने त्याच्याकडे विचित्र प्रकारची मदत मागितली आहे, जी चर्चेत आहे.

खरं तर बासू गुप्ता नावाच्या सोशल मीडिया वापरकर्त्याने आपल्या गावातील माकडांच्या हैदोसामुळे चिंतेत येऊन सोनू सूदकडे मदत मागितली आहे. ही समस्या जाणून घेतल्यानंतर स्वत: सोनूही आश्चर्यचकित झाला आहे.

बासू गुप्ताने ट्वीट करत लिहिले की, ‘सोनू सूद सर आमच्या गावात बबून माकडांच्या हैदोसामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. तुम्हाला विनंती आहे की, माकडांना आमच्या गावातून दूर जंगलामध्ये पाठवावे.’

यावर अभिनेता सोनू सूदनेही आश्चर्यचकित करणारे प्रत्युत्तर दिले आहे. त्याने लिहिले की, ‘आता फक्त माकडांना पकडणेच बाकी राहिले होते मित्रा. पत्ता पाठव, हेही करून पाहुया.’

सोशल मीडियावर सोनू सूदचे हे ट्वीट भन्नाट व्हायरल झाले आहे. सोनूचे चाहते या ट्वीटवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?
तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतंय स्पेलंडर  गाणं, रिलीज झाल्यापासून चार दिवसांत मिळालेत लाखो हिट्स
गुरु रंधावाच्या या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात
प्रीती झिंटाच्या  बुमरो बुमरो  गाण्यावर काश्मिरमध्येच थिरकली शहनाज गिल, व्हिडीओने सोशल मीडियावर मिळविल्या लाखो हिट्स


Leave A Reply

Your email address will not be published.