Saturday, March 2, 2024

‘तू आज आमच्यात नाहीस, पण…’, हार्दिक जोशीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, म्हणाला, ‘फक्त तुझ्यामुळे…’

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हार्दिक जोशीच्या वहिनीचं निधन झाले आहे. याबाबतची माहिती हार्दिकने स्वत: भावूक पोस्ट करत दिली आहे. हार्दिकने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात तो, अक्षया देवधर, त्याची वहिनी असे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. या पोस्टला हार्दिकने भावुक होत कॅप्शन दिले आहे.

हार्दिकने (Hardik Joshi)लिहिले आहे, ““ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीयेस पण तूझ अस्तित्व आमच्यात कायम राहील..जाऊ बाई गावात हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झाल तरी हा शो तू करणारच आहेस आणि योगायोग असा आहे की 4 डिसेंम्बर च्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे. मि नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो तेव्हा कायम डोक्यावर हात फिरऊन तू मला आशीर्वाद द्यायची

तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे, आज मि जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या सोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल Miss you @jyoti.naisha माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको, Always love you always khup khup miss you”, असे हार्दिक जोशीने म्हटले आहे.”

 हार्दिकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून त्याला सांत्वन केले आहे.अनेकांनी त्याच्या वहिणीला भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. हार्दिकच्या चाहत्यांनाही या बातमीने धक्का बसला आहे. हार्दिक जोशी सध्या झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या ‘जाऊबाई गावात’ या कार्यक्रमात झळकत आहे.

आधिक वाचा-
आदिल आधी ‘इतक्या’ वेळा प्रेमात पडली होती राखी सावंत, जाणून घ्या तिच्या बॉयफ्रेंड्सची लिस्ट
सुखी संसार मोडून गर्लफ्रेंडसोबत राहत होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, नावे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हे देखील वाचा