हर्षाली मल्होत्राने केला ‘डिनेरो’ गाण्यावर धमाल डान्स; पाहतच राहिले नेटकरी


सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून घराघरात पोहचलेली छोटी अभिनेत्री म्हणजे हर्षाली मल्होत्रा म्हणजेच मुन्नी होय. चित्रपटात लहान दिसणारी मुन्नी आता खूप मोठी झाली आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडत असतात. ती तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते. तिला तिच्या एकाच चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे आता तिचा फॅन फॉलोविंग देखील खूप आहे. अशातच तिचा एक नवीन व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. 

हर्षालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट तसेच टॉप परिधान केला आहे. तसेच तिने काळ्या रंगाचे शूज घातले आहे. ती ‘डिनेरो’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ती तिच्या घरात डान्स करत आहे. ती जिथे डान्स करत आहे, तिथे मागच्या भिंतीवर ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा पोस्टर फ्रेम करून लावलेला दिसत आहे. तसेच या चित्रपटातील तिचे काही फोटो देखील भिंतीवर लावलेले आहेत. तसेच एका सर्टिफिकेटची देखील फ्रेम दिसत आहे. तिचा हा डान्स तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. (Harshali malhotra dance video viral on social media)

हर्षाली २०१४ मध्ये आलेला ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. कबीर खान यांनी ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सलमान खान आणि हर्षालीसोबत करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दिकी हे देखील होते. पाकिस्तानमधून आलेल्या लहान मुलीला तिच्या मायदेशी पोहचवण्यासाठी सलमान खान त्याच्या जीवाची पर्वा न करता पाकिस्तानमध्ये कसा जातो, ही कहाणी या चित्रपटातून दाखवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरण: राजची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवणी; वकिलांनी जामिनासाठी केला अर्ज

-प्रिया बापट- उमेश कामत यांची जोडी पुन्हा करणार धमाल; ‘आणि काय हवं ३’ लवकरच रसिकांच्या भेटीला

-‘काल मित्राचा कॉल आला, स्ट्रेसमधे होता…’, त्रासात असलेल्या मित्राला संतोष जुवेकरचा बहूमोल सल्ला


Leave A Reply

Your email address will not be published.