Tuesday, October 14, 2025
Home मराठी ‘मराठी दळभद्री कलावंत आपल्या संस्कृतीचा अपमान करतात..’हेमांगी कवीच्या पोस्टवर संतापले नेटकरी

‘मराठी दळभद्री कलावंत आपल्या संस्कृतीचा अपमान करतात..’हेमांगी कवीच्या पोस्टवर संतापले नेटकरी

हिंदी सिनेजगत असो किंवा मराठी सिनेमाजगतात असो अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या अभिनयाईतक्याच त्या आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्तीत जास्त चर्चेत येत असतात. यामधीलच एक मराठी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (Hemangi Kavi). आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत येत असते. इतकेच नव्हेतर अशा पोस्टमुळे तिला अनेकदा नेटकऱ्यांच्या रोशालाही सामोरे जावे लागते. सध्या हेमांगीची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे तिच्यावर चौफेर टिका होताना दिसत आहे. काय आहे ती पोस्ट चला जाणून घेऊ. 

हेमांगी कवी ही मराठी चित्रपट जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने तिने चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. अनेक विषयांवर ती आपले मत यावरुन व्यक्त करताना दिसत असते. सध्या तिची अशीच एक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टिका केल्या आहेत. हेमांगीची ही पोस्ट वटपोर्णिमा सणाबद्दल आहे. ज्यामुळे नेटकरी संतापलेले दिसत आहेत.

https://www.facebook.com/hemangii.kavidhumal

या पोस्टमध्ये हेमांगी कवीने “साता जन्माच्या गोष्टी! नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्वाचं आणि फलदायी व्रत आहे कुठल्याही बायकोसाठी, वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा किंवा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड प्रत्येक वर्षी लावलं तर फक्त त्याचंच नाही तर आपलं ही आयुष्य वाढेल कदाचित! काय?” असे लिहीत वटपोर्णिमा सणाबद्दल मत व्यक्त केले आहे.

हेमांगी कवीच्या या पोस्टमुळे नेटकरी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना हिंदू सण आले की काहींंना त्रास होतो, दुसऱ्या सणांवर कधीच बोलत नाही असे म्हणले आहे तर आणखी एकाने अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले मराठी कलावंत दळभद्री बॉलिवूड चे अनुकरण करण्याच्या नादात आपल्या संस्कृतीचा अपमान करत आहेत. असे म्हणत हेमांगी कवीच्या या पोस्टवर जोरदार टिका केली आहे. तर काहींनी हेमांगी कवीच्या या पोस्टचे कौतुकही केले आहे.

हे देखील वाचा