Tuesday, June 6, 2023

कुणाल- करणचे संगीत आणि सोनाली सोनलच्या आवाजाने बद्ध झालेले टायटल ट्रक होतंय सोशल मीडियावर व्हायरल

अनेक लोकप्रिय मालिकांचे टायटल ट्रॅक आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे ‘कुणाल भगत’ आणि करण सावंत’. त्याच बरोबर संगीत विश्वात आपल्या सुमधूर आवाजाचा ठसा उमटवणारी ट्रेंडींग गायिका म्हणून ‘सोनाली सोनावणे‘ (sonali sonawane) प्रसिद्ध आहे. यांनी नुकतंच ‘योग योगेश्वर जय शंकर’ या मालिकेचं टायटल ट्रॅक केलं आहे. या मालिकेचं टायटल ट्रॅक गायिका सोनाली सोनावणे व गायक रविंद्र खोमणे यांनी गायले आहे तर कुणाल करण यांनी हे गाणं लिहीले असून संगितबद्ध ही त्यांनीच केले आहे. शिवाय या टायटल ट्रॅकचं रेकॉर्डींग कुणाल – करणच्या नवी मुंबई येथील एलीक्झर स्टुडीओमध्ये करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्या टायटल ट्रॅकची तुफान चर्चा आहे.

संगीतकार कुणाल – करण मालिकेच्या टायटल ट्रॅक विषयी सांगतात, “या आधी आम्ही ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, किचन कल्लाकार, बॅंड बाजा वरात, महामिनिस्टर या मालिकेंचे टायटल ट्रॅक केले आहे. गायक रविंद्र खोमणे यांचा रांगडा आवाज आणि गायिका सोनाली सोनावणे हीचा मधाळ आवााज यांची सांगड या नव्या टायटल ट्रॅकमध्ये तुम्हाला अनुभवता येईल. आम्ही याआधी एकत्र काम केल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे हसत्या खेळत्या वातावरणात हे टायटल ट्रॅक रेकॉर्ड करताना आम्ही खूप एन्जॉय केलं. या गाण्याविषयी सांगायचं झालं तर या गीताचे शब्द संगितबद्ध करताना त्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर दिसत होत्या. मनात एक वेगळाच भाव होता. आणि हे प्रत्यक्षात उतरण्यामागेही ईश्वराचे आशीर्वाद आहे. ‘योग योगेश्वर जय शंकर’ या अध्यात्मिक मालिकेचं टायटल ट्रॅक करण्याची संधी कलर्स मराठीने आम्हाला दिली त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.”

गायिका सोनाली सोनावणे टायटल ट्रॅकच्या रेकॉर्डींग दरम्यानचा किस्सा शेअर करताना सांगते, “अनेक अल्बमची गाणी मी याआधी गायली आहेत. परंतु ब-याच दिवसांपासून माझी इच्छा होती की एखाद्या मालिकेचं टायटल ट्रॅक मला गायला मिळावं. आणि ती इच्छा योग योगेश्वर शिव शंकर या मालिकेमुळे पूर्ण झाली. त्यासाठी मी कुणाल – करण आणि कलर्स मराठीचे आभार मानते. मी संगीतक्षेत्रात पाऊल ठेवतानाच मला अनेक भावगीतं गायला मिळाली. आणि आता मालिकाविश्वात प्रवास सुरू करताना मला सुंदर असं अध्यात्मिक टायटल ट्रॅक गायला मिळणं. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सर्वच गाण्यांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. असचं प्रेम कायम असू द्या. हीच सदिच्छा!!”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा