सुपरस्टार ‘थाला’ने जिंकले ४ गोल्ड मेडल, अभिनयाव्यतिरिक्त नेमबाजीतूनही पाडला चाहत्यांच्या मनावर प्रभाव


‘थाला’ नावाने प्रचलित असणारा दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार हा आपल्या हटके लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक महत्त्वाचा आणि नावाजलेला अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. त्याचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहाबाहेर रांग लागलेली असते. केवळ अभिनयच नव्हे तर नेमबाजी आणि कार रेसिंगच्या माध्यमातून आपला प्रभाव तो चाहत्यांच्या मनावर पाडत असतो.

नुकताच अजितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात नेमबाजीमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सुवर्णपदक मिळाले आहे. हा व्हिडिओ तामिळनाडूच्या राज्यस्तरीय नेमबाजी चॅम्पियनशिपचा स्पर्धेचा आहे. ज्यात त्याने भाग घेतला होता आणि अनेक पदके आपल्या नावावर केली होती. यात त्याला चार सुवर्णपदक आणि एक चांदीचे पदक मिळाले आहे.

अजित कुमारचा जन्म १ मे १९७१ मध्ये हैदराबादमध्ये झाला. पण त्याचे पालनपोषण चेन्नईमध्ये झाले. दहावीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर आपले उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याआधीच त्याने आपली शाळा सोडली. त्यानंतर त्यांने रेसिंगमध्ये आपले करियर करायचे ठरवले.

शाळा सोडल्यावर त्याला एक नोकरी मिळली. जिथे त्याने सहा महिने मेकॅनिक म्हणून काम केले आणि सोबतच प्रशिक्षण सुद्धा घेतले. अजितच्या वडिलांना  तिथे काम केलेले पसंत पडले नाही. त्यामुळे आपल्या एका मित्राच्या साहाय्याने त्याला एका एक्स्पोर्ट कंपनी मध्ये कामाला लावले. त्यानंतर सेल्सच्या कामासाठी थालाने इतर देशात प्रवास केला होता.

सोबतच तो टीव्ही आणि वर्तमानपत्रात जाहिरातीसाठी छोटे मोठे काम करत होता. कार रेसिंगमध्ये त्याने खूप सारे पैसे लावले होते. मित्रांकडून तो गाडीचा टायर उधारीवर घेत असत. त्यांनतर त्याच्याकडे पैसे आल्यावर पुन्हा मित्रांच्या मदतीसाठी धावत असत. त्यावेळी रेसिंगमध्ये त्याला खूप पैसे मिळत असत. अभिनयाव्यतिरिक्त तो एक रेसर म्हणून खूप नावारूपास आला. सन २००३ मध्ये त्याने आशियाई बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला होता. त्यानंतर २०१० झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये सहभाग नोंदवला होता.

थालाने आपल्या चित्रपट करियरची सुरुवात १९९० साली आलेल्या ‘एन विजू एन कानावर’ तमिळ चित्रपटातून केली. गायक एस पी सुब्रमण्यम यांनी त्याला चित्रपटात आणले होते. आतापर्यंत अजितने ५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कोणत्याही ओळखीविना चित्रपटात त्याला मिळालेले यश हे वाखाणण्याजोगे आहे.

‘विवेगम’ या चित्रपटात अजितने केलेला अभिनय चाहत्यांच्या फारच पसंतीस पडला होता. सोबतच त्याने ‘अमरावती’, ‘पवित्र’, ‘वानमती’, ‘नेसम’, ‘वाली’, ‘सीटीझन’, ‘किरीडम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील ‘विश्वासम वेदालम’ आणि ‘वीरम’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येकजण त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. शिवाय रजनीकांतप्रमाणे त्याची देखील काही लोक देवाप्रमाणे पूजा करतात. नुकतेच त्याच्या एका चाहत्याने आत्महत्या केली होती. या चाहत्याने आपल्या अख्या शरीरावर अजितचे फोटो काढले होते. अजितचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला तरी ते टॅटू आपल्या तो आपल्या शरीरावर काढत असे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बापरे बाप.!! रागाने लाल झालेले शशी कपूर शत्रुघ्न सिन्हा यांच्यामागे चक्क पट्टा घेऊन धावले होते; वाचा कधीही न ऐकलेला किस्सा

-राजेश खन्नांनी जेव्हा डिंपल यांना प्रपोज केलं, तेव्हा त्यांच्या बोटात ऋषी कपूर यांनी दिलेली अंगठी होती; वाचा पुढे काय झालं

-चित्रपटाचे नाव ठरवताना नक्कीच जेवण सुरु असेल.!! बॉलिवूडमधील सिनेमांची ही भन्नाट नावे वाचून तोंडाला येईल पाणी


Leave A Reply

Your email address will not be published.