हिमेश रेशमिया वाढदिवसाच्या दिवशी पवनदीप-अरुणिताच्या आवाजात देणार अनोखी भेट; ‘तेरी उम्मीद’ लवकरच रसिकांच्या भेटीला


इंडियन आयडल हा सिंगिंग रियॅलिटी शो टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा लोकप्रिय शो आहे. यावर्षी या शोचे सुरु असणारे १२ वे पर्व वेगवेगळ्या कारणांमुळे गाजताना आपण पाहत आहोत. अनेक वाद, ट्रोलिंग यामुळे गाजणारे हे पर्व आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. या शोमधील काही स्पर्धकांना शो संपण्याआधीच मोठे बक्षीस मिळाले आहे.

इंडियन आयडल मधील परीक्षकांची भूमिका सांभाळणाऱ्या गायक संगीतकार असणाऱ्या हिमेश रेशमियाने इंडियन आयडलच्या चार स्पर्धकांना मोठा ब्रेक दिला आहे. पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सवाई भट्ट, मोहम्मद दानिश या चार स्पर्धकांनी हिमेशच्या म्युझिक व्हिडिओमध्ये गाणे गायले आहे. हिमेशने काही दिवसांपूर्वीच त्याचा नवा कोरा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आणला ज्याचे नाव होते, ‘सुरूर २०२१’. हिमेशचे त्यानंतर ‘मूड्स विद मेलोडीज़’, ‘हिमेश के दिल से’ असे म्युझिक अल्बम देखील आले. याच म्युझिक अल्बममधील काही गाणी त्याने इंडियन आयडलच्या स्पर्धकांकडून गाऊन घेतली आहे. (Himesh Reshammiya to release new song teri ummid on his birthday )

Photo Courtesy: Instagram/arunitakanjilal

हिमेशने या सर्व गाण्यांना स्वतः संगीत दिले असून, ही सर्व गाणी तुफान गाजत आहे. त्याच्या ‘सुरूर २०२१’ गाण्याला ६५ मिलियन व्ह्यूज तर २६ मिलियन ऑडिओ स्ट्रीम्स मिळाले आहे. ‘मूड्स विद मेलोडीज’ मधील ‘तेरे बगेर’ हे गाणं पवनदीप राजन आणि अरुणित कांजीलाल यांनी गायले असून, या गाण्याला १७ मिलियन व्ह्यूज तर ४ मिलियन ऑडिओ स्ट्रीम्स मिळाले आहे.

‘हिमेश के दिल से’ अल्बममधील सवाई भट्टने गायलेल्या ‘सांसे’ या गाण्याला ३७ मिलियन व्ह्यूज आणि ४ मिलियन ऑडिओ स्ट्रीम्स मिळाले आहे आणि याच म्युझिक अल्बममधील ‘दगा’ हे गाणे मोहम्मद दानिशने गायले आहे. या गाण्याला १६ मिलियन व्ह्यूज तर २ मिलियन ऑडिओ स्ट्रीम्स मिळाले आहे. ही चारही गाणी यूटुबवर आणि रिल्सवर ट्रेण्डिंग आहे.

आता हिमेश त्याच्या ‘हिमेश के दिल से’ या म्युझिक अल्बम मधील त्याचे ‘तेरी उम्मीद’ प्रदर्शित करणार आहे. हे गाणे पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांनी गायले असून, हिमेश हे गाणे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २३ जुलैला त्याच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल

अनुपम खेर यांनी शेअर केला त्यांच्या टफ वर्कआऊटचा व्हिडिओ; फिटनेस बघाल तर व्हाल हैराण

‘पुन्हा भेटले यारी दोस्तीतील यार दोस्त!’, अभिनेता हंसराज जगतापने केला व्हिडिओ शेअर 

 


Leave A Reply

Your email address will not be published.