Sunday, February 16, 2025
Home अन्य हिना खानचं बहुप्रतिक्षित गाणं ‘बेदर्द’ झालं रिलीझ; अल्पावधीतच या ‘हार्टब्रेकिंग’ गाण्याने गाठला लाखो व्ह्यूजचा टप्पा!

हिना खानचं बहुप्रतिक्षित गाणं ‘बेदर्द’ झालं रिलीझ; अल्पावधीतच या ‘हार्टब्रेकिंग’ गाण्याने गाठला लाखो व्ह्यूजचा टप्पा!

टीव्हीची लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील प्रसिद्ध अक्षरा, म्हणजेच हिना खानला प्रेक्षक खूप पसंत करतात. हिनाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ त्वरित सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान, हिना खानचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीझ झाला आहे. ज्यामध्ये, ती प्रेमात विश्वासघात झालेल्या मुलीचे पात्र साकारताना दिसत आहे.

हिना खान आणि स्टेबिन बेन यांचे हे गाणे ‘बेदर्द’ नुकतेच रिलीझ झाले आहे. हे हार्टब्रेकिंग गाणे स्टेबिन बेन यानेच गायले आहे. हे गाणे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अल्पावधीतच गाण्याला 60 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, जे वेगाने वाढतही आहेत. हे गाणे पॉकेट एफएमच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून रिलीझ करण्यात आले आहे. तसेच, पॉकेट एफएमच्या यूट्यूब चॅनेलवरील हे पहिले गाणे आहे, जे बघता बघताच व्हायरल होत आहे.

अलीकडेच, हिना खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या गाण्याचे फर्स्ट लूक शेअर केले होते, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. इंस्टाग्रामवर या गाण्याचे पोस्टर शेअर करत अभिनेत्री म्हणाली की, “हे गाणे १६ एप्रिल रोजी, दुपारी २ वाजता रिलीझ होणार आहे. तर या गाण्याला तुम्ही सर्व आपले प्रेम द्या.”

यापूर्वी हिनाने रमजानच्या खास प्रसंगी तिचा सुंदर फोटो शेअर करुन, सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले होते. तिने अतिशय खास अंदाजात तिचे बरेचसे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंसह हिनाने ‘रमजान मुबारक’ लिहून चंद्राचा इमोजीही टाकला आहे.

हे देखील वाचा