अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अलीकडेच तिचा प्रसिद्ध झालेला संगीत व्हिडिओ ‘पत्थर वर्गी ’ खूप चर्चेत आहे. हिनाने आपल्या आकर्षक गाऊन आणि सिझलिंग एथनिक वेअरसह फॅशन ट्रेंड सेट केला आहे. आपल्या स्टाईलमुळे अभिनेत्री इंटरनेटवर खूप प्रसिद्ध होत आहे. तिचे फोटो शेअर होताच, व्हायरल होत असतात.
तिची स्टायलिस्ट सायली विद्याने गाण्यातील हिनाचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री पेस्टल कलरचा लेहेंगा परिधान करताना दिसली आहे. हिना या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या चोळीमध्ये व्ही आकाराच्या गळ्याला मोती विणले आहेत. लेहंग्याची फॅब्रिक कच्च्या रेशीममध्ये फ्लोरल, मोटिफ आणि सिक्विनसह भरवली गेली आहे. या लेहंग्यासोबत तिने नेटची सुंदर ओढणी परिधान केली आहे. त्या ओढणीच्या काठावर नाजूक काम केले आहे. जे खूपच सुंदर दिसत आहे.
हिनाने आपल्या पोशाखात चोकर हार, आणि ब्रेसलेट घातले आहे. तिने आल्याप केसांची सुंदर स्टाईल केलेली दिसत आहे. ग्लॅम मेकअप, गालावर गुलाबी रंगाचे सुंदर रोज लावले आहे. भुवया हायलाइट करताना या अभिनेत्रीने ब्राँझ शेडची लिपस्टिक लावली आहे. हिनाने कॅमेर्यामध्ये कमालीच्या पोझ दिल्या आहेत. आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे अभिनेत्री बर्याच लोकांसाठी फॅशन प्रेरणा आहे. भारतीय किंवा पाश्चात्य अभिनेत्री प्रत्येक कपड्यात अप्रतिम दिसते.
हिनाने कलकी फॅशन लेबलच्या डिझाइनचा लेहंगा घातला आहे. या लेहंग्याची किंमत ६२,९४० रुपये आहे. तुम्हाला हा लेहंगा खरेदी करायचा असेल, तर अधिकृत वेबसाईटवरून विकत घेऊ शकता.
याआधीही हिना खान आपल्या काळ्या रंगाच्या, एथनिक सुटमुळे चर्चेत होती. अभिनेत्रीचा ‘पत्थर वर्गी ’ हा नवीन संगीत व्हिडिओ काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे. चाहत्यांना त्यांचे हे गाणे आवडले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान










