Friday, December 20, 2024
[aioseo_breadcrumbs]

कामाच्या शोधात इंग्लंडमध्ये भटकत होता हनी सिंग, पण दिल्लीत ‘अशी’ मिळाली त्याला संधी

हनी सिंगची (Honey Singh) गणना आजच्या लोकप्रिय रॅपर्समध्ये केली जाते, पण एक काळ असा होता जेव्हा त्याला कामासाठी इकडे-तिकडे भटकावे लागत होते. बुधवारी (15 मार्च) हा लोकप्रिय गायक त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.

आपल्या रॅप आणि गाण्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या हनी सिंगचा जन्म 15 मार्च 1983 रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. हिरदेश सिंगपासून यो यो हनी सिंग बनलेल्या रॅपरने केवळ उत्तम गाणी गायली नाही, तर आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम संगीतही दिले आहेत. (honey singh career debut song first break study life read all unknow facts here about birthday boy)

हनी सिंगचा जन्म झाल्यानंतर काही काळानंतर त्याचे संपूर्ण कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. अशा परिस्थितीत हनी सिंगचे संपूर्ण पालनपोषण दिल्लीतच झाले. दिल्लीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हनी सिंगने ठरवले की, तो लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज केंब्रिजमध्ये संगीत शिकण्यासाठी जाणार. संगीताचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तो बराच काळ कामाच्या शोधात इंग्लंडमध्ये भटकला.

हनी सिंगने एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला होता. तो 2005 मध्ये कामाच्या शोधात इंग्लंडमध्ये भटकत होता. त्यादरम्यान त्याच्या एका रेकॉर्डिंगसाठी दिल्लीत आला होता. त्याच दरम्यान त्याची पंजाबी गायक अशोक मस्ती यांच्याशी भेट झाली. त्या काळात अशोक मस्ती त्यांच्या एका अल्बमवर काम करत होते. हनी सिंग हा संगीतकार आणि गायक असल्याचे कळल्यावर, त्यांनी त्याला गाणे कंपोज करण्यास सांगितले. मात्र, अशोक मस्ती यांना हनी सिंगचे गाणे आवडले नाही आणि त्यांनी त्याला नकार दिला.

पण अशोक मस्तीने 6 महिन्यांनी हनी सिंगला शोधायला सुरुवात केली. त्यामागचे कारण म्हणजे, अशोकच्या निर्मात्याच्या मुलाला त्याचे गाणे आवडले. त्यानंतर हनी सिंगने ते गाणे रॅपसह इंग्रजीत गायले. हळूहळू त्याला काम मिळू लागले. 2011 मध्ये त्याच्या इंटरनॅशनल व्हिलेजर अल्बममधून खरी ओळख मिळाली. हा अल्बम प्रेक्षकांना इतका आवडला की, हनी सिंग रातोरात स्टार झाला. तरुणांना त्याची गाणी ऐकायला आवडू लागली. त्यानंतर हळूहळू हनी सिंग प्रत्येक तरुणाची पसंती बनला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शहनाज गिल असे काय म्हणाली की, दुसऱ्यांना हसवणाऱ्या कपिल शर्माला देखील हसणे झाले अनावर

लग्नाच्या प्री फंक्शन्समध्ये साऊथ इंडियन लूकमध्ये दिसली अभिनेत्री स्वरा भास्कर, फोटो व्हायरल

हे देखील वाचा