मागील काही वर्षांंपासून ऐतिहासिक आणि पौराणिक सिनेमांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बॉलिवूडमधील अनेक निर्माता, दिग्दर्शकांनी हिंदू पौराणिक कथांवर अनेक सिनेमे तयार केले. बहुतकरून त्यात ऍनिमेटेड चित्रपटांचा समावेश जास्त आहे. काही महिन्यांपूर्वी आमिर खानने महाभारत सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही कारणास्तव हा सिनेमा आता तयार होणार नाही.
आता हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते असलेल्या मधू मंटेना यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट समजल्या जाणाऱ्या ‘रामायण’ या सिनेमाची इंडस्ट्रीमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या सिनेमामध्ये रावणाची भूमिका ऋतिक रोशन साकारणार असल्याची माहिती आहे. शिवाय सिनेमातील मुख्य अभिनेत्रीसाठी दीपिका पदुकोणच्या नावाची चर्चा आहे. चित्रपटाच्या टीमकडून याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा झाली नसली, तरीही या दोघांची नावं आघाडीवर असल्याची माहिती आहे. आता दोन एवढे मोठे सुपरस्टार एका सिनेमात येणार म्हटल्यावर हा सिनेमा ग्रँड असणार यात शंकाच नाही.
या चित्रपटाला आणखी ग्रँड करण्यासाठी सिनेमाच्या टीमकडून या चित्रपटाच्या वेषभूषेसाठी अमेरिकेच्या मोठ्या आणि प्रसिद्ध वेषभूषेच्या टीमसोबत चर्चा चालू आहे. याच वेषभूषेच्या टीमने लोकप्रिय आणि गाजलेल्या हॉलिवूडच्या ‘अवतार’ सिनेमासाठी कॉस्च्युम डिझाईन केले होते. जर सर्व ठरवल्याप्रमाणे झाले, तर हीच टीम या ‘रामायण’ सिनेमातील ऋतिकच्या भूमिकेसाठी वेशभूषा तयार करेल. सिनेमाला भव्य दिव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सिनेमाच्या टीमकडून विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.
या चित्रपटाबद्दल अजून बरीच रंजक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे या सिनेमाचे बजेट भरपूर मोठे असणार आहे. हा सिनेमा जवळपास ५०० कोटी रुपयांमध्ये तयार होणार असल्याचे म्हटले जात आहे. या सिनेमाची शूटिंग लाईव्ह-ऍक्शन ट्रायलॉजीमध्ये होणार असून, हा सिनेमा 3D मध्ये चित्रित केला जाणार आहे. शिवाय हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगु या तीन भाषांमध्ये तयार होणार आहे. या सिनेमाला मधू मंटेना, अल्लू अरविंद, नामित मल्होत्रा हे त्रिकुट तयार करणार आहेत. या चित्रपटाबद्दल एवढी माहिती ऐकून हा सिनेमा नक्कीच हॉलिवूडपटाला टक्कर देणारा असेल यात शंका नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस
-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज
-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय