Friday, July 12, 2024

ऋतिक सबासोबत, तर सुजैन अर्सनालसोबत! कथित जोडप्यांना एकत्र पार्टी करताना पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

हिंदी चित्रपट जगतात प्रेम, ब्रेकअप, घटस्फोट, लग्न या गोष्टी अगदी सामान्य मानल्या जातात. याचे अगदी अलिकडचे उदाहरण म्हणजे ऋतिक रोशनची गोवामधील पार्टी. सध्या अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आजादच्या (Saba Azad) प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर त्याची पत्नी सुजैन खानही (Sussane Khan) अर्सनाल गोनीसोबत (Arsnal Goni) फिरताना दिसत आहे.

ऋतिक रोशन आणि सुजैनचा घटस्फोट होऊन अनेक वर्ष उलटले असले, तरी आजही ते एकमेकांसोबत फिरताना दिसत असतात. अलिकडेच अभिनेता ऋतिक रोशन सबा आजादसोबत गोव्यामध्ये फिरताना दिसला होता. त्याचवेळी सुजैनही अर्सनाल गोनीसोबत गोवा फिरायला गेली होती. मात्र यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, या सर्वांचे एकत्र पार्टी करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत, तर अनेकांनी त्यांना ट्रोलही केले आहे.

अभिनेता ऋतिक रोशनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऋतिक रोशन त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आजादसोबत तर सुजैन खान तिचा कथित बॉयफ्रेंड अर्सनाल गोनीसोबत पार्टी करताना दिसत आहेत. तेही वेगवेगळे नव्हे, तर एकत्रितपणे! सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पूजा बेदीसोबत ऋतिक रोशन आणि सबा आझाद दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत पूजा बेदीसोबत सुझान आणि अर्सलान दिसत आहेत.

दोन्ही फोटोंमध्ये पूजा बेदी एकाच आउटफिटमध्ये दिसत आहे, ज्यावरून ते चौघे एकत्र पार्टी करत असल्याचे दिसून येते. इतकेच नाही, तर अलीकडेच ऋतिक रोशन सबा आझादचा हात धरून विमानतळावरून बाहेर पडताना दिसला आणि त्यानंतर लगेचच सुजैनही एअरपोर्टवर अर्सलानचा हात धरताना दिसली. त्यामुळे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पार्टीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

दरम्यान या व्हायरल फोटोची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून त्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हायरल फोटोवर प्रतिक्रिया देताना एका युजरने “हे चांगले आहे भाऊ” असे म्हणले आहे. तर काही जणांनी याला म्हणतात समजूतदारपणा असे म्हणत, खिल्ली उडवली आहे. तर दुसऱ्याने “काय कौटुंबिक वातावरण आहे”  म्हणत चांगलीच मजा घेतलेली दिसत आहे. याआधीही अनेकदा ऋतिक रोशन आणि सबा आजाद एकत्र फिरताना दिसले होते. त्यांच्या लग्नाचीही चर्चा त्यावेळी रंगली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

अधिक वाचा :

रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दमदार दिग्दर्शकासोबत करणार काम

दिवसेंदिवसच अधिकच स्टायलिश होत चाल्लेत बिग बी, लेटेस्ट फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

बिग बॉस विनर तेजस्वी प्रकाशने पाडवाच्या मुहूर्तावर खरेदी केली एक कोटीची आलिशान गाडी

हे देखील वाचा