Wednesday, December 6, 2023

ऋता दुर्गुळेने केले भावाचे लग्न एन्जॉय, साडीतील सौंदर्य पाहून; चाहता विचारतोय ‘तुमचे लग्न कधी?’

झी युवा या वाहिनीवरील ‘फुलपाखरू‘ या मालिकेला आख्ख्या महाराष्ट्राने अगदी डोक्यावर घेतले होते. या मालिकेने विशेषतः तरुण वर्गाला भुरळ घातली होती. यासोबत या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला देखील खूप लोकप्रियता मिळाली. तिचे निखळ सौंदर्य, गोड हसू यासोबत गालावर पडणारी छोटीशी खळी यावर अवघा तरुणवर्ग भुलला होता. तसेच मालिकेत वैदेही आणि मानसची जोडी आणि त्यांची प्रेम कहाणी देखील चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतर तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. ऋता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच ऋताचा एक सुंदर फोटो समोर आला आहे.

नुकतेच ऋताच्या भावाचे लग्न झाले आहे. या वेळी लग्नातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ऋताने सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे. यावर तिने कानात केवळ ईअरिंग घातले आहेत. बाकी कोणतीही ज्वेलरी तिने परिधान केली नाही. तसेच कपाळी छोटीसी टिकली लावली आहे. या साडीमध्ये ऋता फार सुंदर दिसत आहे. (Hruta durgule share her beautiful saree photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने “भाई की शादी”, असे कॅप्शन दिले आहे. तिचे हे सुंदर फोटो अनेकांना आवडते आहेत. तिच्या या फोटोवर तिचे चाहते तसेच अनेक कलाकार देखील कमेंट करत आहेत. या फोटोवर ऋतुजा बागवे हिने “साडी खूपच आवडली आहे,” अशी कमेंट केली आहे. तसेच रिना मधुकर हिने “सो प्रीटी” अशी कमेंट केली आहे. तसेच तिच्या एका चाहत्याने “तुमचे लग्न कधी आहे?,”अशी कमेंट केली आहे.

ऋता ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखांमध्ये फॉलोवर्स आहेत. तिने या आधी ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले आहे. ती सध्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेतील तिचे दिपू नावाचे पात्र देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

हेही वाचा :

विकी कौशल आणि कॅटरिना कैफने केला नवीन घरात गृहप्रवेश, अनुष्का-विराटचे होणार शेजारी

‘नाटू नाटू’ गाण्यावर सिद्धार्थ आणि अक्षयाने धरला ठेका, पाहून थिरकतील तुमचेही पाय

यावर्षी ‘या’ कलाकारांच्या मृत्यूच्या उडाल्या होत्या अफवा, अनेक मोठ्या सेलिब्रिटींचा देखील होता समावेश 

 

हे देखील वाचा