Wednesday, December 6, 2023

‘नाटू नाटू’ गाण्यावर सिद्धार्थ आणि अक्षयाने धरला ठेका, पाहून थिरकतील तुमचेही पाय

झी मराठीवर नवीन मालिका सुरू होणार आहे. या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अशातच आणखी एक नवीन मलिका येत आहे. या मालिकेचे नाव आहे, ‘हे तर काहीच नाय‘ या शोचे अनेक प्रोमो समोर आले आहेत. या प्रोमोवरून ही गोष्ट समजत आहे की, हा एक कॉमेडी शो असणार आहे. यामध्ये अनेक कलाकार येऊन त्यांच्या आयुष्यातील मजेशीर घटना सांगत आहेत. अशातच शोच्या‌ सेटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये दोन लाडके कलाकार डान्स करत आहेत. व्हिडिओमध्ये सिद्धार्थ जाधव(siddharth Jadhav) आणि अक्षया देवधर (akshaya deodhar)  हे ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स करत आहेत. अक्षया या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. तसेच सिद्धार्थ हा या शोमध्ये त्याच्या आयुष्यातील काही किस्से सांगण्यासाठी आला आहे. त्यावेळी त्यांनी हा व्हिडिओ केला आहे. (Siddharth Jadhav and Akshya deodhar dance video viral on social media)

या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांना हा डान्स व्हिडिओ खूप आवडला आहे. या गाण्यात दोघांनीही डोळ्यावर चष्मा लावला आहे. तसेच ते दोघे या गाण्याचा डान्स स्टेप्स फॉलो करत आहेत.

तसेच हा शो बघण्यासाठी सगळे खूप उत्सुक आहेत. अक्षया देवधर या शोमधून पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने या आधी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेनंतर ती खूप नावारूपाला आली. सिद्धार्थने नुकतेच ‘झोंबिवली’ या चित्रपटात ‘अंगात आलया’ या गाण्यात डान्स केला आहे. त्यामुळे तो देखील सध्या चांगलाच प्रकाशझोतात आहे.

हेही वाचा :

यावर्षी ‘या’ कलाकारांच्या मृत्यूच्या उडाल्या होत्या अफवा, अनेक मोठ्या सेलिब्रिटींचा देखील होता समावेश

सुपरस्टार कलाकारांचे २०२१ मध्ये ‘हे’ सिनेमे ठरले सुपरफ्लॉप, अनेक अनपेक्षित चित्रपटांचा देखील आहे समावेश

‘पिंजरा’ ते ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ असा आहे अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

 

हे देखील वाचा