Saturday, September 30, 2023

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ बाबतीत बनला पहिला भारतीय सुपरस्टार, लगेच वाचा

दोन वर्षांपूर्वी 17 डिसेंबर 2021 रोजी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल अभिनित ‘पुष्पा‘ सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने लोकप्रियतेसोबतच प्रचंड पैसाही कमावला होता. ‘पुष्पा’च्या यशानंतर प्रत्येक चाहता या ‘पुष्पा: द रूल’ या सिनेमाची वाट पाहत आहे. अशात अभिनेत्याने एका कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अल्लू अर्जुन भारताचा पहिला सुपरस्टार बनला आहे, ज्याच्यासोबत स्वत: इंस्टाग्रामने कोलॅब केले आहे. अलीकडेच इंस्टाग्रामने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सुरुवात अल्लू अर्जुनच्या घरातून सुरू होऊन शेवट ‘पुष्पा 2’च्या सेटवर होतो.

काय आहे व्हिडिओत?
अल्लू अर्जुन आणि इंस्टाग्राम (Allu Arjun And Instagram) यांची कोलॅब पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामने शेअर केलेल्या या व्हिडिओत दिसते की, इंस्टाग्रामची अधिकृत टीम सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या घरी पोहोचली आहे. यावेळी अभिनेता त्यांचे स्वागत करताना दिसत आहे. यासोबतच व्हिडिओत अल्लूही दिसत आहे. या व्हिडिओत अभिनेता सांगतो की, त्याच्या दिवसाची सुरुवात कशी होते. यावेळी तो त्याचे गार्डन, ध्यान साधना करण्याचे ठिकाण आणि स्विमिंग पूलही दाखवतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instagram (@instagram)

यानंतर अल्लू कॉफी पितो आणि शूटिंगसाठी निघतो. शूटिंगसाठी जात असताना तो वाटेत कुटुंबाशी व्हिडिओ कॉलवरही बोलतो. यानंतर तो चाहत्यांची भेट घेतो आणि पुन्हा ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) सिनेमाची शूटिंग सुरू करतो. शूटिंगदरम्यानचे काही व्हिडिओही समोर आले आहेत.

किती होते ‘पुष्पा’चे कलेक्शन?
खरं तर, फक्त ‘पुष्पा’ (Pushpa) सिनेमानेच नाही, तर यातील गाण्यांनी आणि डायलॉग्जनेही चाहत्यांची मने जिंकली होती. बराच काळ सोशल मीडियावर श्रीवल्ली आणि ‘ऊ अंटावा’ या गाण्यांची चलती पाहायला मिळाली होती. याव्यतिरिक्त ‘झुकेगा नहीं साला’, ‘फ्लॉवर नहीं फायर हैं मैं’ यांसारख्या अनेक डायलॉग्जवरील चाहत्यांचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. रिपोर्टनुसार, या सिनेमाने हिंदी बॉक्स ऑफिसवर 108.26 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर ओटीटीवर रिलीज झाल्यावरही सिनेमाला चांगली पसंती मिळाली होती.

‘पुष्पा 2’ कधी होणार रिलीज?
अलीकडेच ‘पुष्पा’ सिनेमासाठी अल्लू अर्जुन याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. या बातमीने फक्त अभिनेताच नाही, तर त्याच्या कुटुंबाचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओही समोर आले होते. आता हाती आलेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा 2’ सिनेमा पुढील वर्षी 22 मार्च, 2024 रोजी रिलीज होणार आहे.

या सिनेमात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि फहाद फासिल (Fahadh Faasil) यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या सिनेमासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. (icon star allu arjun became the first superstar whose home was visited by instagram itself)

हेही वाचा-
बॉयफ्रेंडने धोका दिला, तर काय करणार शाहरुखची लेक? लक्षवेधी उत्तर देत म्हणाली, ‘मी त्याला…’
गुडन्यूज! रक्षाबंधननिमित्त निर्मात्यांकडून ‘Gadar 2’च्या चाहत्यांना खास सरप्राईज, कधीपर्यंत लागू असेल ऑफर?

हे देखील वाचा