Saturday, September 30, 2023

बॉयफ्रेंडने धोका दिला, तर काय करणार शाहरुखची लेक? लक्षवेधी उत्तर देत म्हणाली, ‘मी त्याला…’

सुपरस्टार्समध्ये गणला जाणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे ‘किंग’ खान अर्थातच, शाहरुख खान होय. शाहरुख खान याच्या कुटुंबातून एका व्यक्तीने अभिनयात पदार्पण केले आहे. ती व्यक्ती इतर कुणी नसून शाहरुख खानची लेक सुहाना खान आहे. सुहाना झोया अख्तर हिच्या नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या ‘द आर्चीज‘ या सिनेमातून अभिनयात पाऊल ठेवत आहे. अलीकडेच सुहानाने माध्यमांशी बोलताना तिचे सिनेमातील पात्र आणि वैयक्तिक आयुष्य कसे वेगळे आहे, हे सांगितले. याव्यतिरिक्त तिने नुकत्याच झालेल्या मुलाखतीत रिलेशनशिपबद्दलही मत मांडले.

रिलेशनशिपवर काय म्हणाली सुहाना खान?
सुहाना खान (Suhana Khan) हिला ‘द आर्चीज’ (The Archies) सिनेमाविषयीच्या चर्चेदरम्यान अनेक प्रश्न विचारले गेले होते. यातील एक प्रश्न बॉयफ्रेंडविषयी प्रश्न विचारला गेला होता. तो प्रश्न असा होता की, जर तिच्या बॉयफ्रेंडने इतर मुलींमध्ये रस दाखवला, तर ती काय करेल? या प्रश्नाचे उत्तर दोन बाजूंनी दिले.

‘मला वन वुमन मॅन आवडतात’
या प्रश्नाचे उत्तर देताना सुहानाने सुरुवातीला सिनेमातील पात्र वेरोनिका (Veronica) हिच्या दृष्टीकोनातून उत्तर देत म्हटले, “वेरोनिकाशी संपर्क साधणाऱ्या मुलांची यादी लांबलचक आहे. तीदेखील दुसऱ्या मुलांशी बोलणे सुरू करू शकते.” याव्यतिरिक्त तिने खऱ्या आयुष्यातील बॉयफ्रेंडविषयी विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे उत्तर देत म्हटले, “जर माझ्या बॉयफ्रेंडने असे केले, तर मी त्याला सोडून देईल. कारण, मी एक अशी मुलगी आहे, जिला ‘वन वुमन मॅन’ आवडतात. मला अशा मुलासोबत नाते पुढे नेणे आवडणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहानासोबत दिसणार हे स्टारकिड
खरं तर, नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या झोया अख्तर हिच्या ‘द आर्चीज’ या सिनेमात सुहाना वेरोनिका या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा कॉमिक पुस्तक आर्चीजवर आधारित आहे. या सिनेमात सुहानाव्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूर यांचाही समावेश आहे. अलीकडेच असे वृत्त आले होते की, सुहाना आणि अगस्त्य नंदा एकमेकांना डेट करत आहेत. (the archies actress suhana khan on boyfriend said if my boyfriend cheats on me then i will read more)

हेही वाचा-
गुडन्यूज! रक्षाबंधननिमित्त निर्मात्यांकडून ‘Gadar 2’च्या चाहत्यांना खास सरप्राईज, कधीपर्यंत लागू असेल ऑफर?
वडिलांच्या निधनानंतर तणावामुळे गश्मीर महाजनीचं वाढलं ‘एवढं’ वजन, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

हे देखील वाचा