Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड गुडन्यूज! रक्षाबंधननिमित्त निर्मात्यांकडून ‘Gadar 2’च्या चाहत्यांना खास सरप्राईज, कधीपर्यंत लागू असेल ऑफर?

गुडन्यूज! रक्षाबंधननिमित्त निर्मात्यांकडून ‘Gadar 2’च्या चाहत्यांना खास सरप्राईज, कधीपर्यंत लागू असेल ऑफर?

गल्ली ते दिल्ली सध्या एक सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. तो सिनेमा इतर कुठला नसून अभिनयाचा ‘पॉवरहाऊस’ असलेला सनी देओल याचा ‘गदर 2‘ आहे. गदर 2 सिनेमाने आतापर्यंत 450 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशात 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण साजरा केला जात आहे. या निमित्ताने निर्मात्यांनी चाहत्यांना गदर 2चे स्पेशल गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतर चित्रपटगृहात जवळपास 3 कोटींहून अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. यामुळे बॉक्स ऑफिसवरही चांगलीच धमाल पाहायला मिळाली.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘गदर 2’ची 2 सोबत 2 तिकीटे मोफत
रक्षाबंधन (Rakshabandhan) या खास सणाच्या निमित्ताने ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना खास भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गदर 2 सिनेमाच्या 2 तिकिटांवर 2 तिकीटे मोफत देण्याचा निर्णय घेतला. खरं तर, ही ऑफर 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यानच लागू असणार आहे. तसेच, सिनेमाबद्दल चाहत्यांची क्रेझ पाहता, असे म्हटले जाऊ शकते की, हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यातही विक्रमी कमाई करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

बॉक्स ऑफिसवर किती छापले?
‘गदर 2’ बॉक्स ऑफिस कलेक्शन (Gadar 2 Box Office Collection) जाणून घ्यायचं झालं, तर अनिल शर्मा दिग्दर्शित या सिनेमाने 2 आठवड्यात कमाईचे अनेक विक्रम मोडत 450 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा 500 कोटी रुपयांची क्लबमध्ये सामील होईल, असे बोलले जात आहे.

सिनेमाची स्टारकास्ट
या सिनेमात सुपरस्टार सनी देओल ‘तारा सिंग’ भूमिकेत, तर अमीषा पटेल ‘सकीना’च्या भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त सिनेमात उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (raksha bandhan 2023 with film gadar 2 special family offer buy 2 tickets get 2 free know full details)

हेही वाचा-
वडिलांच्या निधनानंतर तणावामुळे गश्मीर महाजनीचं वाढलं ‘एवढं’ वजन, खुद्द अभिनेत्याचा खुलासा
रवींद्र महाजनी यांच्या लेकीबद्दल माहित आहे का? जाणून घ्या कशी आहे गश्मीरची ‘छोटी आई’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा