भयंकर! ‘ही’ अभिनेत्री होती गरोदर, बाळ नको असल्याने गर्भपात केल्याची बातमी आली होती समोर!


बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे इलियाना डिक्रुझ. इलियाना ही तिच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिला सोशल मीडियावर अनेक युजर्सकडून बॉडी शेमिंगबद्दल अनेक कमेंट येत असतात. इलियानाने बॉडी शेमींग आणि माणसांची मानसिकता यावर भाष्य केले होते. तीने आधी पासूनच या गोष्टींकडे कानाडोळा केला आहे. पण आता तिच्याबद्दल अनेक फेक बातम्या देखील येत आहे. या सगळ्या बातम्यांना ती खूप धैर्याने सामोरे जात आहे. तिच्या एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, ती कशी खोट्या अफवांची शिकार बनली होती.

काही दिवसांपूर्वी इलियानाबद्दल अशी माहिती समोर आली होती की, ती गरोदर होती आणि तिला हे बाळ नको असल्याने तिने गर्भपात केला आहे. एवढंच नाही तर तिने अगदी आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला होता अशा काही बातम्या तिच्याबद्दल येत होत्या.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा तिला तिच्या गरोदरपणाबद्दल विचारले गेले होते, तेव्हा तिने उत्तर दिले की,”माझ्याबद्दल अनेक बातम्या समोर आल्या होत्या. त्या बातम्यानुसार मी गरोदर होते, आणि मी गर्भपात केला होता. या अशा बातम्या वाचून मला वाटते की, खरचं माणसं इतरांच्या बाबतीत एवढा वाईट विचार करतात का?? हे सगळं खूपच भयावह आहे.”

इलियानाने पुढे सांगितले की,”अशीच एक आणखी बातमी आली होती की, मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण मी त्यातून वाचले आणि माझ्या नोकराने या गोष्टीची माहिती दिली. पण मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नव्हता. एवढंच काय तर माझ्या घरी कोणताच नोकर नाहीये. मी आज जिवंत आहे. मीडियाच्या या वागण्याला काहीच अर्थ नाहीये. मला हा प्रश्न पडतो की, त्यांना हा मसाला मिळतो तरी कुठून??”

वृत्तपत्रांच्या माहितीनुसार 2018 साली अशी बातमी समोर आली होती की, इलियाना तिच्या बॉयफ्रेंडच्या बाळाची आई होणार होती. परंतु तिला हे बाळ नको असल्याने तिने गर्भपात केला आहे. पण त्यावेळी देखील तिने पोस्ट करून ही बातमी खोटी असल्याची माहिती दिली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.