भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. दोघेही सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करत असतात. त्यांचे चाहते त्यांच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत असता. सध्या हे दोघे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच दुसऱ्या बाळाचे पालक होणार असल्याचे बोलले जात आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बी-टाऊनचे पॉवर कपल आहे. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये या जोडप्याने मोठ्या थाटामाटात लग्न केले. लग्नाच्या चार वर्षांनंतर या जोडप्याने वामिका कोहली नावाच्या मुलीचे स्वागत केले. आता बातमी येत आहे की, अनुष्का आणि विराट लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहेत.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. अनुष्का तिची दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर अनुष्का शर्मा सध्या दुसऱ्या आई होणार आहे असे म्हटले जात आहे. गेल्या वेळेप्रमाणेच या वेळीही ती तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगणार आहे.अशी चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
अनुष्का शर्माच्या प्रेग्नेंसीची अफवाही पसरत आहेत. कारण काही काळापूर्वी ही अभिनेत्री पती विराट कोहलीसोबत मुंबईतील एका प्रसूती क्लिनिकमध्ये दिसली होती. त्यावेळी अनुष्का आणि विराटने पापाराझींना फोटो आणि व्हिडिओ पोस्ट न करण्याची विनंती केली होती. इतकेच नाही तर अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या लाइमलाइटपासूनही दूर आहे. अनुष्का शर्मा पाच वर्षांनंतर ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात ती भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. (Indian cricketer Virat Kohli and actress Anushka Sharma are going to be parents to their second child)
आधिक वाचा-
–‘अरे मेल्यानो तुम्हाला आहे का हिम्मत?’ अविनाश नारकर यांना ट्रोल करणाऱ्यांना चाहत्यांनी दिले सडेतोड उत्तर
–सिनेइंडस्ट्रीला आणखी एक धक्का, सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफरचे निधन, दिग्गज सत्यजित रॉय सोबत केलेलं काम