Sunday, April 14, 2024

अनुष्का शर्माने ‘जी ले जरा’ चित्रपटाला मारली ठाेकर, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

फरहान अख्तरचा ‘जी ले जरा‘ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी प्रियांका चोप्राने हा चित्रपट सोडला असल्याच्या चर्चा हाेत्या. या पाठाेपाठच कॅटरिनाने देखील या चित्रपटातून पावले मागे घेतल्याचे सांगण्यात येत हाेते. मात्र, हे वृत्त खोटे असल्याचे सिद्ध झाले. मग अशी चर्चा झाली की, प्रियांका चोप्राच्या भूमिकेसाठी निर्माते अनुष्का शर्मा आणि कियारा अडवाणीशी संपर्क साधत आहेत. मात्र, अशात अनुष्का शर्माने या चित्रपटाची ऑफर नाकारल्याचे वृत्त आहे.

माध्यमातील वृत्तांनुसार, अनुष्का शर्मा (anushka sharma) हा चित्रपट करण्यासाठी खूप उत्सुक हाेती. मात्र, अनुष्काला तारखे संबधित समस्या येत असल्याने तिला या चित्रपटाला नकार द्यावा लागला. अशात कास्टिंगच्या समस्यांमुळे फरहानने सध्या चित्रपट थांबवला आहे. ती सध्या तिच्या अभिनय असाइनमेंटवर लक्ष केंद्रित करत आहे, ज्याची निर्मिती आमिर खान करत आहे. हा स्पॅनिश स्पोर्ट्स कॉमेडीचा रिमेक आहे. यानंतर ती ‘डॉन 3’वर लक्ष केंद्रित करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्का शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची 2018 मध्ये आलेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती शाहरुख खानसाेबत मुख्य भूमिकेत होती. यानंतर तिने ‘बुलबुल’ आणि ‘पाताळ लोक’ या चित्रपटांची निर्मिती केली. 2022 मध्ये, तिने काला चित्रपटात एक छोटीशी भूमिकाही साकरली होती. अशात आता अनुष्का ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी ती खूप मेहनत घेत आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा चित्रपट महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.(bollywood movie jee le zaraa anushka sharma reject film offer replacement priyanka chopra )

अधिक वाचा-
‘मैं पुण्य हूं या पाप हूं… नाम तो सुना होगा’, शाहरुख खानच्या ‘जवान’चा अ‍ॅक्शन-पॅक्ड दमदार ट्रेलर रिलीज
सिद्धार्थ जाधव सारखा दिसणारा ‘हा’ माणुस तुम्ही पाहायलाय का? पाहा फोटो

हे देखील वाचा