Friday, December 1, 2023

‘अरे मेल्यानो तुम्हाला आहे का हिम्मत?’ अविनाश नारकर यांना ट्रोल करणाऱ्यांना चाहत्यांनी दिले सडेतोड उत्तर

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अविनाश नारकर (avinash narkar) हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो आपण सोशल मीडियावर पाहत असतो अनेक मालिका आणि चित्रपटात काम केल्यानंतर आजही ते खूप चर्चेचा विषय ठरले आहेत.

अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या नारकर हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते अनेक व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात त्यांचे डान्सचे व्हिडिओ तसेच योगा करतानाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर होत असतात.

त्यांचे व्हिडिओ काहींना आवडतात तर काहींना आवडत नाही. काही दिवसांपूर्वी अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी गणपतीतील आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावरील बनवली होती आणि ती सोशल मीडियावर पोस्ट केली होती. परंतु अनेकांना त्यांचा हा अंदाज आवडला नाही आणि त्यांच्यावर सोशल मीडियावर कमेंट करून टीका देखील करण्यात आली होती.

परंतु ज्याप्रमाणे अविनाश नारकर यांच्यावर टीका करतात त्याचप्रमाणे त्यांना सपोर्ट करणारे देखील लोक आता आहेत. ज्या लोकांनी तुमच्यावर टीका केल्या आहेत त्या लोकांना त्यांच्या समर्थकांनी चांगला टोला लावला आहे.

यावर एका समर्थकाने लिहिले आहे की, “अरे मेल्यानो तुम्हाला आहे का हिम्मत असं करायची? तुम्हाला फक्त लोकांना नाव ठेवता येतात बाकी काही येणार नाही. ते स्वतःच्या बळावर इथपर्यंत पोहोचले आहेत. त्यांचा स्वभाव खूप छान आहे. आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे काही करता येत नाही तर नाव तरी ठेवू नका.”

त्याचप्रमाणे आणखी एका समर्थक आलेली आहे की, “सर तुमची जोडी खूप चांगली आहे अगदी प्रेरणादायी यांना जीवन कळले हो.” अशाप्रकारे अनेक जण त्यांच्या या व्हिडिओवरती कमेंट करत आहेत आणि त्यांना सपोर्ट करत आहेत अविनाश नगर हे सध्या झी मराठीवर ’36 गुणी जोडी’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘यापेक्षा मी मेले तर बरं होईल’, शेहनाज गिलने इंडस्ट्रीबद्दल केला धक्कादायक खुलासा
‘मला जास्त ब्रेक नको’ डिलिव्हरीनंतर दिशा परमार लवकरच करणार टेलिव्हिजनवर आगमन

हे देखील वाचा