‘इंडियन आयडल १२’ चा फिनाले रविवारी (१५ ऑगस्ट) रोजी पार पडला. त्याचबरोबर हा फिनाले तब्बल १२ तासांचा होता आणि हा कार्यक्रम जवळजवळ १० महिने चालला. या कार्यक्रमात टॉप ६ स्पर्धकांनी एकापेक्षा एक असे जबरदस्त परफॉर्मन्स दिले होते, पण पवनदीप राजन ५ स्पर्धकांना मागे टाकून विजेता झाला. या अंतिम सामन्याच्या निमित्ताने प्रत्येक स्पर्धकांचे कुटुंबीयही उपस्थित होते. पवनदीप राजनचे कुटुंब देखील चंपावत उत्तराखंडहून या फिनालेसाठी पोहोचले होते. या कार्यक्रमात जर पवनदीप राजन व्यतिरिक्त कोणत्या स्पर्धकाने लोकांची मने जिंकली, तर ती म्हणजे अरुणिता कांजिलाल होती. तिला शोच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले होते.
पवनदीपच्या बहिणीने अरुणितासोबत काढला फोटो
अरुणिता कांजिलाल आणि पवनदीप राजनची जबरदस्त केमिस्ट्री या कार्यक्रमात दिसून आली. याचसोबत पवनदीपची बहीण ज्योतीदीपसोबत अरुणिताचे खूपच चांगले संबंध दिसून आले. हा कार्यक्रम संपल्यानंतर ज्योतीदीपने अरुणितासोबत एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघीही खूपच सुंदर दिसत आहेत. एकीकडे, अरुणिता तपकिरी शिमरी ड्रेसमध्ये, तर ज्योतीदीप लाल आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत.
सोशल मीडियावर लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला
ज्योतीदीपने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच अनेक चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या. चाहत्यांना त्यांचा हा फोटो खूप आवडला. त्याचबरोबर एकाने कमेंट केली की, “वहिनीला घरी घेऊन जावा.” पुढे एकाने लिहिले की, “अरुणिता कांजिलाल ही ज्योतीदीपची वहिनी होईल.” दुसऱ्या एका युजरने कमेंट केली की, “तुमच्या वहिनी, वहिनीला घरी आणा.” आणखी एका युजरने कमेंट केली की, “आमची लाडकी वहिनी.” त्याचबरोबर इतर चाहत्यांनी हार्ट इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत.
प्रेमाने ठेवण्याचा दिला सल्ला
प्रेक्षकांना या दोघींची जोडी खूप आवडली आहे. सोशल मीडियावर लोकांनी अरुणिता कांजिलाल यांना ज्योतीदीपची वहिनी म्हणून घोषित केले आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत ज्योतीदीपला सांगितले की, “त्यांनी अरुणिताला प्रेमाने ठेवावे.” दुसऱ्या एका युजरने प्रतिक्रिया दिली की, “वहिनी आमची प्रिय अरुणिता.”
एकमेकांना मारली मिठी
अरुणिता कांजिलाल आणि पवनदीप राजन यांनी एकमेकांना मिठी मारली आणि निरोप घेतला. एका मीडिया वाहिनीशी साधलेल्या खास संभाषणात पवनदीपने सांगितले की, त्याला आणि अरुणिताला एकमेकांशी बोलायला फारसा वेळ मिळाला नाही, पण अरुणिताने त्याचे अभिनंदन केले. तसेच सांगितले की, ती त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.
इंडियन आयडलमधील लाडके जोडपे
पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल हे ‘इंडियन आयडल १२’ मधील सर्वात लाडके स्पर्धक होते. प्रेक्षकांनाही या दोघांची जोडी खूप आवडली होती. त्याचबरोबर सोशल मीडियावर या दोघांची केमिस्ट्री बऱ्याच जणांना आवडली. याशिवाय, दोघांनीही त्यांच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्यांची मैत्री नेहमीच राहणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच