‘इंडियन आयडल’ फेम सायली कांबळेचा बॉयफ्रेंडसोबत झाला साखरपुडा


सध्या मनोरंजनविश्वात शेहनाईचे सूर वाजताना दिसत आहे. अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत असताना काही कलाकार त्यांचे लग्न जाहीर करत आहे तर काही कलाकार साखरपुडा करताना दिसत आहे. यात छोट्या पडद्यावरील कलाकार देखील मागे नाही. छोट्या पडद्यावरील सर्वात गाजणार सिंगिंग रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल’. इंडियन आयडलच्या १२ व्या पर्वाने तर तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. या पर्वात टॉप ५ फायनलिस्ट देखील तुफान लोकप्रिय झाले. याच टॉप ५ स्पर्धकांपैकी एक असणाऱ्या सायली कांबळेने नुकतीच एक आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.

‘इंडियन आयडल’च्या १२ व्या पर्वातील सुरेल आवाजाची गायिका असणाऱ्या सायली कांबळेने नुकताच साखरपुडा केला असून, त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सायलीने तिच्या इंस्टा स्टोरीमध्ये तिच्या साखरपुड्याच्या एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सायली तिची अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील यात स्पष्ट दिसून येत असून, तिच्या हातावरची मेहेंदी देखील सर्वांना आवडत आहे.

यासोबतच सायलीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिला प्रपोज करतानाच एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सायलीला तिच्या बॉयफ्रेंडने अतिशय फिल्मी आणि रोमँटिक स्टाईलने प्रपोज केले आहे. याशिवाय तिच्या फॅनपेजवर त्यांच्या एंगेजमेंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. धवलने या साखरपुड्याची काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत रोमॅंटिक कॅप्शन देत लिहिले, “मी नेहमीच तुझ्यासोबत असणार आहे. तुझ्यासोबत हसण्यासाठी, जेव्हा तुला लो फील होईल तेव्हा तुला प्रेरित करण्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणत्याही अटीशिवाय तुझ्यावर प्रेम करण्यासाठी.”

इंडियन आयडलमध्ये सहभागी झाल्यानंतर सायलीने सांगितले की, ती अतिशय गरीब घरातून आली आहे. तिच्याकडे टीव्ही देखील नाही. मात्र काही दिवसांनी तिचा सुरेश वाडकर यांच्यासोबत स्टेजवर गात असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले गेले.

हेही वाचा-

सलमान खानने शेअर केलेल्या शर्टलेस फोटोवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केलेली कमेंट झाली व्हायरल

बर्थडे गर्ल करिश्मा शर्माचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

‘भाबीजी घर पर हैं’ मधील ‘या’ अभिनेत्याने केले बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम, ‘या’ मालिकेने बदलवले आयुष्य


Latest Post

error: Content is protected !!