दु:खद! कंधारमध्ये रिपोर्टिंग करताना भारतीय फोटो जर्नालिस्ट दानिशची हत्या; बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली


तालिबानमुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अशातच आता कंधार येथील कव्हरेजसाठी गेलेला भारतीय फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकीची हत्या करण्यात आली आहे. दानिशची हत्या कंधारच्या स्पिन बोल्डक भागात एका चकमकीदरम्यान झाली होती. तो रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी रिपोर्टिंग करत होता. त्याच्या मृत्यूमुळे भारतावर शोककळा पसरली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.

दानिशच्या हत्येची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. भारतीय गीतकार आणि पार्श्वगायक स्वानंद किरकिरे यांनी दानिशच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “सच दिखलाने का जुनूँ लिये एक और बहादुर खेत रहा.”

तसेच बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढानेही दानिशला श्रद्धांजली वाहत ट्वीट केले. तिने लिहिले की, “रेस्ट इन पावर दानिश.”

याव्यतिरिक्त सध्याचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही दानिशच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, “तो आपल्या मागे आपले शानदार काम सोडून गेला आहे.” त्याचबरोबर रॉयटर्सनेही दानिशच्या निधनावर एक पोस्ट शेअर केली आहे.

यापूर्वीही केला होता संकटांचा सामना
दानिशने १३ जुलै रोजी एक ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती की, तो ज्या गाडीत होता, त्यावर हल्ला झाला होता. त्याने ट्वीट करत लिहिले होते की, “माझे नशीब चांगले होते की, मी वाचलो.”

दुसरीकडे अफगाणिस्तानवर सुरू असलेल्या संकटाचे अपडेट कॅमेऱ्यात कैद करणारा दानिश आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहिला. (Indian Photo Journalist Danish Siddiqui Dies While Reporting In Kandahar Bollywood Celebs Mourns)

दानिशची कारकीर्द
दानिशने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही जर्नालिस्ट म्हणून केली होती. त्यानंतर तो फोटो जर्नालिस्ट बनला होता. दानिशने राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टोरीही कव्हर केल्या आहेत. इतकेच नव्हे, तर त्याला सन २०१८ मध्ये रोहिंग्या शरणार्थ्यांच्या संकटावरील फिचर फोटोग्राफीसाठी पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेग्नन्सीवेळी केलेल्या फोटोशूट दरम्यान करीना कपूर झाली होती बेशुद्ध, म्हणाली, ‘मला या काळात खूप…’

-स्विमिंग पूलच्या कडेला मोनालिसाने दिल्या घायाळ करणाऱ्या पोझ; पाहून वाढतील तुमच्याही हृदयाचे ठोके

-शुभमंगल सावधान!!! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले विवाहबंधनात; लग्नसोहळ्याचे खास फोटो आले समोर


Leave A Reply

Your email address will not be published.