अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता-बरखा बिष्ट यांच्या नात्यात दुरावा? अफेअरच्या बातम्यांवर अभिनेत्याने सोडले मौन


ग्लॅमर दुनियेत वावरताना कलाकारांना रोज वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. कलाकार पब्लिक फिगर असल्याने त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडते. कलाकारांच्या बाबतीत बऱ्याचदा अनेक बाबतीत अफवा उडत असतात. कधी त्या अफवा त्यांच्या व्यावसायिक जीवनाशी संबंधित असतात तर कधी वैयक्तिक जीवनाशी संबंधित. मात्र कलाकारांच्या वैयक्तिक जीवनासंदर्भात उडणाऱ्या अफवांचे प्रमाण नक्कीच जास्त असते. या अफवांच्या खेळातून लहान-मोठे, टीव्ही, सिनेमा जगतातील कोणतेच कलाकार सुटलेले नाही.

अशातच आता टीव्ही आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता असलेल्या इंद्रनील सेनगुप्ता आणि त्याची बायको अभिनेत्री बरखा बिष्‍ट यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्व अलबेल नसल्याच्या बातम्या सध्या पसरत आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात सुखी आणि परफेक्ट कपल म्हणून या जोडप्याकडे पाहिले जाते. मात्र आता या जोडीमध्ये वाद सुरु असण्याच्या बातम्या असून, इंद्रनीलचे त्याचा सहाय्यक अभिनेत्रींसोबत नाव जोडले जात आहे.

इंद्रनील हा बंगाली फिल्म इंडस्ट्रीमधला मोठा आणि लोकप्रिय कलाकार आहे. एक बंगाली चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने इंद्रनील फेब्रुवारीमध्ये कोलकातामध्ये गेला होता. या सिनेमात त्याच्यासोबत काम करणाऱ्या ईशा साहा या अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले जात आहे. (indraneil sengupta and barkha bisht marriage in trouble?)

या बातम्यांवर इंद्रनीलने एक मुलाखतीदरम्यान सांगितले की, “या सर्व बातम्या माझ्याही कानावर आल्या आहेत. मात्र त्या सर्व अफवा आहे. मीडियामध्ये या बातम्या मोठ्या प्रमाणावर चालणार हे मला माहीतच होते. माझे नाव कोणासोबत जोडून अफवा पसरवल्या जात आहे, हे देखील मला माहित आहे. मात्र माझे आणि बरखाचे वैवाहिक जीवन अतिशय सुखात सुरु आहे.”

या अफवांवर ईशा साहाने सांगितले की, “माझ्या आयुष्यात असे पहिल्यांदा घडत नाहीये की, माझे नाव कोणासोबत जोडले जाते. याआधी देखील अनेक दिग्दर्शकांसोबत माझे नाव जोडले गेले आहे. पूर्वी मला या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा, मात्र आता मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे. काही काळाने या अफवा देखील मागे पडतील.”

तत्पूर्वी २००६ मध्ये इंद्रनील आणि बरखा एका मालिकेच्या सेटवर भेटले होते. त्यानंतर त्यांनी २००८ मध्ये लग्न केले. या जोडप्याला ९ वर्षांची एक गोड मुलगी देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायक रोहित राऊत गिरवतोय प्रेमाचे धडे! जाणून घ्या कोण आहे त्याच्या आयुष्यातील ‘ती’ खास व्यक्ती

-‘धाकड’ सिनेमासाठी अर्जुन रामपालचे गजब ट्रान्सफॉर्मेशन; नवीन लूकमध्ये अभिनेत्याला ओळखणेही झाले कठीण

-अभिनेता वरुण सूदला झाली गंभीर दुखापत; ‘खतरो के खिलाडी’ शोमध्ये स्टंट करताना झाला अपघात


Leave A Reply

Your email address will not be published.