×

सुतापा सिकंदरने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘या’ कारणासाठी केले इरफान खानला माफ

बॉलिवूडमधील प्रभावी अभिनेता म्हणून इरफान खान (irrfan khan) ओळखला जातो. त्याने अतिशय चांगल्या सिनेमांमधून उत्तम आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या भूमिका साकारल्या. आज जरी इरफान आपल्यात नसला तरी तो त्याच्या चित्रपटांमधून आपले मनोरंजन करतच आहे, किंबहुना पुढेही करत राहील. आज जरी इरफान आपल्यात नसला तरी त्याची पत्नी सुतापा (sutapa sikdar) आणि मुलगा बाबील (Babil) सतत सोशल मीडियावर इरफानच्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. शिवाय त्याचे थ्रो बॅक फोटो देखील ते शेअर करत असतात. २५ जानेवारी रोजी सुतापा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या दिवशी सुतापाने इरफानला आठवत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सुतापाने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत इरफानला आठवत इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत इरफानला माफ केले आहे. सुतापाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “आपण एकत्र घालवलेल्या ३२ वर्षातील २८ वाढदिवस लक्षात न ठेवण्यासाठी मी तुला माफ करते इरफान. मला माझ्या वाढदिवसाच्या आधीच्या रात्री झोपच आली नाही. रात्रभर एवढ्या वर्षातील वाढदिवसाच्या आठवणी मला आठवत होत्या. तुझे प्रत्येक वर्षी माझा वाढदिवस विसरणे, त्यानंतर मी नाराज होणे आणि मग पुढच्यावर्षी तू नाही सुधारणार हा विचार करत तुझ्या वाढदिवस विसरण्याचा विचित्र कारणांपुढे आनंदाने माझा राग विसरण्यापर्यंत मला सर्व काही आठवत होते.”

View this post on Instagram

A post shared by Sutapa Sikdar (@sikdarsutapa)

पुढे सुतापाने लिहिले, ” या वेळेस तू ही चूक करू शकला नाहीस आणि या वर्षी बाबील आणि अयानने ही चूक होऊ दिली नाहीस. त्यांना माझा वाढदिवस लक्षात होता. मला वाटते की, तूच त्यांना झोपेत माझा वाढदिवस आठवून दिला असशील, जिथे तू नेहमीच विसरून जायचा. चियर्स आज दोन्ही मुलांनी मला खूप प्रेम दिले आणि आम्हाला तुझी खूपच आठवण आली.”

तत्पूर्वी २९ एप्रिल २०२० रोजी इरफानचे कॅन्सरमुळे दुःखद निधन झाले होते. तो अखेरचा ‘अंग्रेजी मीडिअम’ सिनेमात दिसला होता. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे खूपच कौतुक करण्यात आले होते.

हेही वाचा :

Latest Post