[rank_math_breadcrumb]

धुरंदर 2च्या कमाईमुळे अक्षय कुमार घाबरले? टॉक्सिक सारखीच भूत बंगलाची रिलीज डेट बदलेल? स्वतः अभिनेत्याने दिलं उत्तर

अक्षय कुमार हा बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेता आहे. तो त्याच्या नवनवीन गोष्टी, चित्रपट त्यासाठी चर्चेत असतो. तर त्याचा आगामी चित्रपट म्हणजे भूत बंगला, हा चित्रपट सध्या रिलीजआधी चर्चेत आहे. कारण दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहे. या जोडीने भूल भुलैया’शी आणि असे आतापर्यंत उत्तम चित्रपट दिले आहेत.

चित्रपटसृष्टीत सध्या बॉक्स ऑफिसवर ॲक्शन-क्राईम थ्रिलर्सचे वर्चस्व आहे. विशेषतः रणवीर सिंगचा ‘धुरंधर 2’ सध्या सर्व विक्रम मोडत आहे, पण अक्षय कुमारला आपल्या चित्रपटाच्या आशयाबद्दल विश्वास आहे. तर आदित्य धर दिग्दर्शत धुरंधर (dhurandhar)2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे आणि हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित झाला. तसेच या चित्रपटाच्या आसपास रिलीजडेट असणाय्रा अनेक निर्मात्यांनी चित्रपट रिलीज केले नाही. तर रिलीजच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. अशा परिस्थितीत एक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे धोका मानला जात होता.

अक्षय म्हणाला की तो ट्रेंड्सनुसार चित्रपट बनवत नाही. त्याने कबूल केले की ‘धुरंधर 2’ हा एक उत्तम चित्रपट आहे आणि त्याने तो स्वतः पाहिला आहे, पण त्याने एक महत्त्वाचा फरक स्पष्ट केला. अक्षयच्या मते, “धुरंधर हा हिंसा आणि गांभीर्य असलेला प्रौढांसाठीचा चित्रपट आहे, तर ‘भूत बंगला’ मुलांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी बनवला आहे.” अभिनेत्याचा विश्वास आहे की एक चांगली कथा कोणत्याही ट्रेंडच्या पलीकडे असते. भूत बंगला या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल, राजपाल यादव, तब्बू आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

दमदार सस्पेन्स-थ्रिलरची रिलीज डेट बदलली, पहिल्या दोन भागांनी बदलले होते सिनेमाचे समीकरण, तर 7 भाषांमध्ये बनले रीमेक