बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टरने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात ईशान उंच पर्वत चढताना (रॉक क्लाइंबिंग) करताना दिसत आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, त्याचा सावत्र भाऊ शाहिद कपूरही त्याच्यावर खूप प्रभावित झाला आहे. ईशानच्या व्हिडिओवर त्याची कथित प्रेयसी अनन्या पांडे आणि शाहिद कपूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ईशान खट्टर स्वतःच्या सुरक्षतेची काळजी घेऊन उंच पर्वत चढताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना ईशानने लिहिले, ‘आम्ही त्या प्रत्येक पर्वताला पार करून पुढे जाणार आहोत, जे आमच्या वाटेत येतील.’
यावर प्रतिक्रिया देताना शाहिद कपूरने ईशानची प्रशंसा केली आहे. शाहिद लिहितो, ‘खूप, खूपच सुंदर.’ दुसरीकडे ईशानची कथित प्रेयसी अनन्या पांडेने, त्याच्या रॉक क्लाइंबिंग कौशल्यावर प्रतिक्रिया करत मशरूम, कोळी आणि वानर यांचे इमोजी पोस्ट केले आहेत.
ईशान खट्टरच्या बऱ्याच चाहत्यांनीही त्याच्या व्हिडिओवर कमेंट करून त्याचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, ‘खूपच सुंदर.’ त्याच वेळी दुसऱ्याने कमेंट केली की, ‘चला आता आपण या पर्वताला एकत्र पार करूयात.’ आणखी एका युजरने लिहिले, ‘छान, तुझा खूप अभिमान आहे. हाताला मॉइश्चराइज लावत राहा, आणि सन क्रीम लावायला विसरू नकोस.’
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ईशान खट्टर शेवटी मकबूल खान यांच्या ‘खाली-पिली’ चित्रपटात, अनन्या पांडेसोबत दिसला होता. झीप्लेक्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर अनन्या, आणि ईशान खट्टर गेल्या वर्षी मालदीवच्या सुट्टीवर गेले होते. या दोघांनीही आपल्या ट्रिपचे अनेक व्हिडिओ, आणि फोटो शेअर केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…










