‘शिक्षणाच्या आईचा घो’ चित्रपटातली चिमुरडी आता झालीये बरीच मोठी; लवकरच करू शकते ‘या’ चित्रपटातून पुनरागमन


सन २०१० मध्ये आलेला ‘शिक्षणाच्या आईचा घो’ हा चित्रपट तूफान हिट झाला होता. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला. या चित्रपटातील कलाकारांना देखील यातून बरीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात सचिन खेडेकर, भरत जाधव, सक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. यातील बालकलाकार म्हणजेच सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य हे दोघे भलतेच भाव खाऊन गेले. यातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले होते.

या चित्रपटाची कथा वडील आणि मुलाच्या मतभेदांवर आधारित आहे. सक्षम कुलकर्णीने साकारलेले पात्र श्रीनिवास राणे हा शाळेतील एक सरासरी विद्यार्थी असतो. त्याला शिक्षणात इतका रस नसतो, जितका क्रिकेटमध्ये असतो. क्रिकेटमध्ये तो माहीर असतो. मात्र इतर पालकांप्रमाणे त्याच्या वडिलांचा देखील असा विश्वास असतो की, मुलाची बुद्धी केवळ त्यांच्या मार्कशीटमध्ये दिसून येते. म्हणूनच त्याचे वडील अभ्यासासाठी त्याच्यावर दबाव आणतात. परंतु श्री हा दबाव हाताळू शकत नाही. रागाच्या भरात त्याचे वडील असे काहीतरी करतात ज्यामुळे त्यांना पश्चात्ताप करावा लागतो.

एकंदरीत भावनिक कथा असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री गौरी वैद्यने देखील महत्वाची भूमिका साकारली होती. यात तिने दुर्गाचे पात्र निभावले होते. त्यावेळी १५ वर्षांची असलेली गौरी आता २६ वर्षांची झाली आहे. तिच्या रूपात देखील बराच बदल झाला आहे, त्यामुळे तिची ओळख पटणेही कठीण झाले आहे. (it difficult recognize chimurdi movie shikshanachya aicha gho it seems now)

शालेय शिक्षण पूर्ण करत असतानाच, गौरी चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. मुंबईतील माटुंगा येथील डी जी रुपारेल या महाविद्यालयातून तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे तिने इंजिनिअरिंग ऍंड कम्प्युटर टेक्नॉलॉजीमधून पदवी धारण केली.

‘शिक्षणाच्या आईचा घो’ या चित्रपटापूर्वी सक्षम आणि गौरीने २००८ साली आलेल्या ‘दे धक्का’ चित्रपटातही एकत्र काम केलं आहे. तसेच गौरी २०१५ साली ‘आव्हान’ चित्रपटातही झळकली आहे.

बऱ्याच वर्षांपासून गौरी मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र ती लवकरच पुनरागमन करण्याची शक्यता आहे. कारण ‘दे धक्का’ चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासोबतच गौरी पुनरागमन करेल असा अंदाज लावला जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास


Leave A Reply

Your email address will not be published.