[rank_math_breadcrumb]

तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं.., धुरंदर 2च्या यशावर आदित्य धर यांची प्रतिक्रिया

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आणि आता सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

‘धुरंधर’ 2चे दिग्दर्शक आदित्य धर (Dhar)हे आहेत. दरम्यान आता आदित्य धर यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आणि जे काही चित्रपटाचे यश आहे ते  त्यांनी आपल्या टीमला दिले. तर याबाबत चित्रपटात एक दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राकेश बेदीने आपल्या इंस्टाग्रामवर याची एक झलक शेअर केली आहे.

राकेश बेदीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आदित्य धर म्हणाले, “माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आभार, ज्योती देशपांडे, आणि अर्थातच, माझे विभाग प्रमुख, माझी टीम, कलाकार आणि ज्यांनी या चित्रपटासाठी आपले सर्वस्व पणाला लावले त्या प्रत्येकाचे आभार. तर ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. तर या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तो प्रचंड यशस्वी ठरला. चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की, तोंडी प्रसिद्धी हेच त्याचे सर्वात मोठे प्रसिद्धीचे साधन ठरले. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1350 कोटींहून अधिक कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले. यानंतर, त्याचा सिक्वेल, ‘धुरंधर 2 आता आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

चक नॉरिस कोण होते? यांनी घडवला अक्षय कुमार यांच्या आतला मार्शल आर्टिस्ट, तर आता यांच्या निधनामुळे अक्षय कुमार भावुक