धोनी सिनेमात सुशांत सिंग सोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, फेसबुकवर शेअर केली सुसाइड नोट


मनोरंजनाच्या क्षेत्रात मागील काही काळापासून आत्महत्यांचे सत्र सुरु झाले आहे. अनेक कलाकार वेगवगेळ्या कारणांसाठी आत्महत्या करत असल्याच्या बातम्या सतत येत आहे. मागच्या वर्षी सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली आणि सगळीकडे एकच खळबळ माजली. आता सुशांत सिंग सोबत एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात काम केलेल्या संदीप नहार या अभिनेत्याने आत्महत्या केली आहे.

संदीपने मुंबई येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्याने कौटुंबिक कारणामुळे त्याचे जीवन संपवले आहे. १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. संदीपने मृत्यूपूर्वी सोमवारी संध्याकाळी एक व्हिडिओ आणि सुसाईड नोट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यात त्याने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले. संदीपने सांगितल्यानुसार, तो त्याच्या पत्नीमुळे खूपच वैतागला होता आणि त्यामुळेच तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले आहे.

संदीपने त्याच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, “आता जगण्याचीच इच्छा होत नाहीये. आयुष्यात अनेक सुख दु:ख पाहिली, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणे भ्याडपणाचे लक्षण आहे आणि हे मला माहितीये. मला सुद्धा जगायचे होते. पण काय करू इथे आत्मसन्मान आणि समाधान नाहीये, तर जगून तरी काय करू …माझी बायको कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधीच समजून घेतले नाही किंवा कधी तसा प्रयत्न देखील केला नाही. माझी बायको खूपच संतापी आहे. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे…रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची आता माझ्यात शक्ती नाही… यात माझ्या बायकोची चूक नाही…कारण तिला सगळे सामान्यच वाटते… पण माझ्यासाठी ते असामान्य आहे…

मी मागील अनेक वर्षांपासून मुंबईत आहे… खूप वाईट वेळही पाहिली पण कधी इतका तुटलो नव्हतो… खूप काम केले, डबिंग केले, जिम ट्रेनर झालो. वन रुम किचनमध्ये ६ जणांसोबत राहिलो… खूप संघर्ष होता मात्र समाधान होते. आज मी खूप काही मिळवले आहे. पण लग्नानंतर मिळणारे समाधान मला कधीच नाही मिळाले. मागच्या २ वर्षात खूप काही बदलले आहे. ही गोष्टी मी कुणासोबत शेअर करु शकत नाही. जगाला सर्वकाही ठीक सुरु आहे असेच वाटत असेल… कारण ते फक्त आमच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सगळे खोटे आहे… जगाला आम्ही आमची चांगली प्रतिमा दाखवण्यासाठी हे टाकतो. पण हे सर्व खोटे आहे. एक विनंती आहे, मी गेल्यानंतर कांचनला काहीच बोलू नका, फक्त तिच्या डोक्याचा इलाज करा.”

संदीप नाहरने अक्षय कुमारसोबत ‘केसरी’ चित्रपटात, तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्येही विविध भूमिका साकारल्या होत्या. मात्र त्याची एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातील सुशांत सिंग राजपूतच्या मित्राची भूमिका खूप गाजली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-
मी तुम्हाला खूप त्रास देत आहे म्हणत प्रसिद्ध टिक टॉक स्टार डेझरियाची आत्महत्या
कुमकुम  फेम अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी केली होती आत्महत्या, वाचा कारण
कुणी फळविक्री केली तर कुणी केली आत्महत्या… कोरोना काळात या कलाकारांना करावा लागला आर्थिक संकटांचा सामना!


Leave A Reply

Your email address will not be published.