×

जॅकी श्रॉफ यांच्यासमोरच सोडला होता त्यांच्या भावाने जीव, आजही आहेत त्या घटनेने दुःखी

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ (jackie shroff) हे जेवढे त्यांच्या चांगले कलाकार आहेत तेवढेच ते एक दिलदार व्यक्ती देखील आहेत. त्यांच्या आयुष्याची कहाणी कोणत्या चित्रपटाच्या कहाणीपेक्षा कमी नाही. त्यांची हिरो बनण्याची कहाणी अगदी फिल्मी आहे. त्यांचे बालपण असो, लग्न असो किंवा करिअर असो असे वाटते जसे काय देवाने एका चित्रपटाची स्क्रिप्टच लिहिली आहे. त्यांनी अगदी गरिबीत त्यांचे बालपण घालवले. मुंबई मध्ये आल्यावर ते एका चाळीत राहत होते. तेथील अनेक लोकांना त्यांनी मदत केली आहे. त्यामूळे ते जग्गू दादा म्हणून लोकप्रिय झाले होते. परंतु हे जग्गू दादा बनण्यामागील कहाणी देखील दुःखद आहे.

अनेकांच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात याचे उदाहरण पाहिजे असेल, तर जॅकी श्रॉफ यांचे आयुष्य. त्यांच्या घरची आर्थिक स्थिती खूप नाजूक होती. त्यामुळे त्यांना मधेच शिक्षण सोडावे लागले होते. परंतु या परिस्थितीला तोंड देतच जयकिशन काकुभाई जग्गूभाई बनले होते. यामागे एक इमोशनल कहाणी आहे. त्यांनी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा एक मोठा भाऊ होता जो खूप जास्त भावनिक होता. परंतु त्या चाळीचा दादा तोच होता. (jackie shroff brother died in front of him, know full story)

जॅकी श्रॉफ १० वर्षाचे होते, तेव्हा दोघे भाऊ समुद्रावर फिरायला गेले होते. तेव्हाच त्यांच्या भावाची नजर एका व्यक्तीवर गेली जी व्यक्ती पाण्यात बुडत होती. त्यावेळी स्वतःला पोहता येत नसताना देखील त्यांच्या भावाने त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. आपल्या भावाला बुडताना पाहून त्यांनी एका केबलचे वायर तोडली आहे त्यांच्याकडे टाकली. परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही आणि त्यांचा भाऊ त्यांच्या डोळ्यासमोर पाण्यात बुडाला. या गोष्टीचे त्यांना खूप दुःख झाले की, ते त्यांच्या भावाला वाचवू शकले नाही. त्यानंतर त्यांनी ठरवले की, चाळीतील लोकांना मदत करायची.

जॅकी श्रॉफ हे नाव त्यांना बॉलिवूडने दिले. त्यांना सुभाष घाई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटाने त्यांना अगदी सुपरस्टार बनवले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि करिअरमध्ये केवळ प्रगतीच झाली.

हेही वाचा :

Latest Post