Thursday, February 22, 2024

‘या’ चित्रपटातून नीना गुप्तांसोबत स्क्रीन शेअर करत जॅकी श्रॉक करणार सिनेसृष्टीत कमबॅक; पाहा ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी आजपर्यत सिनेसृष्टीत त्यांच्या अभिनयाची जादू दाखवून लोकांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण केले आहे. जॅकी श्रॉफ यांचे लाखो चाहते आहेत. आता जॅकी श्रॉफ यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जॅकी श्रॉफ यांनी सिनेसृष्टीत कमबॅक केले आहे.जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री नीना गुप्ता सध्या त्यांच्या आगामी ‘मस्त में रहने का’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘मस्त में रहने का’चा ट्रेलर आज 4 डिसेंबर 2023 रोजी आऊट झाला आहे.

‘मस्त में रहने का’ प्रेक्षकांना भावनिकरित्या गुंतवून ठेवेल आणि त्यांना जीवन जगण्याचा खरा अर्थ विचार करण्यास प्रोत्साहित करेल. आता चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘मस्त में रहने का’चा (Mast Mein Rahne Ka) ट्रेलर रिलीज केला आहे.जॅकी श्रॉफ ( Jackie Shroff ) आणि नीना गुप्ता ( Neena Gupta ) यांच्यातील सुंदर केमिस्ट्री दिसून येते. ते वयाने तसेच सामाजिक बंधनांनी बांधलेले आहेत, त्यांचे जीवन पूर्णपणे विरुद्ध आहे. यानंतर काही घटनांनंतर ते भेटतात. दोघांमध्ये हशा आणि धमाल दाखवण्यात आली आहे. दोघंही आपलं आयुष्य जगण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. दोघांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना जॅकी श्रॉफ (Jackie Shroff Movie) म्हणाले की, एक अभिनेता म्हणून मी नेहमीच अशा भूमिका शोधत आलो आहे. ज्यामुळे मला एक कलाकार म्हणून माझ्या क्षमतांची चाचणी घेता येईल. भूमिका ज्या अर्थपूर्ण आणि वेगळ्या आहेत. जेव्हा मी ‘मस्त में रहने का’ ची स्क्रिप्ट वाचली तेव्हा ही कथा किती अनोखी आहे हे पाहून मी मंत्रमुग्ध झालो. नीना गुप्ता म्हणाल्या की, आयुष्यात अडचणीनी भरलेल्या स्त्रीची इतकी सुंदर रचलेली भूमिका साकारताना मला आनंद होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

 ‘मस्त मे रहे का’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय मौर्य यांनी केले आहे. त्याचवेळी पायल अरोरा आणि विजय मौर्य यांनी मिळून त्याची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात अभिषेक चौहान, मोनिका पनवार, राखी सावंत आणि फैसल मलिक हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

आधिक वाचा-
‘सेक्स आणि हिंसा…’, ‘अ‍ॅनिमल’च्या रिलीजनंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा व्हिडिओ व्हायरल
अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ सिनेमाच्या रिलीझ डेटमध्ये बदल, सिनेमा होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

हे देखील वाचा