जॅकलिन फर्नांडिसच्या बोल्ड फोटोशूटने लावली सगळीकडे आग; चादरीच्यामागे स्वतःला लपवताना दिसली अभिनेत्री


कलाकार नेहमी त्यांचे वेगवेगळे फोटोशूट करताना दिसतात. कलाकार आणि त्यांच्या फोटोशूटचे अनेक फोटो ते सोशल मीडियावरही शेअर करतात. या फोटोशूटमुळेच ते प्रचंड लाइमलाईटमध्ये देखील येतात. कलाकार आणि त्यांचे नवनवीन फोटोशूट नेहमी फॅन्समध्ये चर्चेचा विषय असतो. बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला फोटोग्राफर हे नाव जरी कोणी उच्चारले तरी डोळ्यासमोर आणि डोक्यात एकच चेहरा आणि नाव येते ते म्हणजे डब्बू रत्नानी. डब्बू नेहमीच मोठ्यामोठ्या कलाकरांना त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना दिसतो. डब्बू हे नाव आता ब्रँड झाले आहे. अभिनेत्रींचे तर स्वप्न असते डब्बू रत्नानीकडून फोटोशूट करून घ्यायचे.

श्रीलंकन ब्युटी असणाऱ्या जॅकलीन फर्नांडिसने नुकतेच डब्बूकडून तिचे शूट करून घेतले आहे. तिचे हे फोटोशूट सध्या फॅन्समध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. जॅकलिनने तिचे हे बोल्ड शूट केल्यानंतर तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. या फोटोंमध्ये जॅकलिनने एका पांढऱ्या चादरीमागे स्वतःला लपवले आहे. मोकळे केस तिच्या निखळ सौंदर्यात अधिक भर घालताना दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच इंटेन्स, बोल्ड आणि आकर्षक दिसत आहे.

तिच्या या फोटोशूटचे फोटो खुद्द डब्बू रत्नानीने सोशल मीडियावर शेअर केले आहे. डब्बूने हे फोटो शेअर करताना लिहिले, “रोज सकाळी लवकर उठा. कारण जेव्हा इतर लोकं स्वप्न बघत असतील, तेव्हा तुम्ही तुमची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काम करू शकाल. सुंदर जॅकलिन.” या फोटोंवर काही वेळातच लाखो लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

जॅकलिन फर्नांडिस ही नुकतीच रॅपर बादशहासोबत त्याच्या ‘पानी पानी’ गाण्यात दिसली होती. तिचा हा व्हिडिओ तुफान हिट झाला आणि व्हायरल देखील झाला आहे. या दोघांचे हे गाणे सध्या खूप गाजताना दिसत आहे. यासोबतच तिने सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमातही एका गाण्यात डान्स केला होता.

जॅकलिन फर्नांडिस लवकरच ‘भूत पोलीस’ या सिनेमात झळकणार आहे. सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. यात ती अतिशय सुंदर आणि घायाळ करणाऱ्या लूकमध्ये दिसत आहे. यासोबतच ती ‘अटॅक’, ‘सर्कस’, ‘बच्चन पांडे’, ‘रामसेतू’ या सिनेमात भूमिका निभावताना दिसणार आहे. शिवाय ती ‘हरि हरा वीरा मल्लू’ या सिनेमातून तामिळ सिनेमात पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.