हॉलिवूडवर शोककळा! ‘टायटॅनिक’ चित्रपटाच्या अभिनेत्याचे दुखःद निधन

0
76
david worner
Photo Courtesy: Twiitter

हॉलिवूड सिने जगतातून सध्या एक दुखःद बातमी समोर येत असून ब्रिटिश कॅरेक्ट अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. ते काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. वॉर्नर यांनी अनेक मोठ्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. टायटॅनिक आणि ओमेन सारख्या चित्रपटातील भूमिकांसाठी ते ओळखले जातात. 

अभिनेते वॉर्नर यांचा जन्म 1941 साली मँचेस्टरमध्ये झाला. 1997 मध्ये रिलीज झालेल्या जेम्स कॅमेरॉनच्या टायटॅनिक चित्रपटात ते स्पायसर लव्हजॉयच्या भूमिकेत दिसले होते. 1976 च्या हॉरर क्लासिक ‘द ओमेन’ मधील छायाचित्रकार कीथ जेनिंग्जच्या भूमिकेसाठीही तो ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही त्यांची नेहमी आठवण जपू. एक उदार साथीदार, दयाळू माणूस आणि वडील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आमच्या आयुष्यात आदर्श निर्माण केला आहे. आमचे हृदय तुटले आहे.

वॉर्नर त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी खूप प्रसिद्ध होता. त्यांनी ‘ट्रॉन’ (1982), ‘लिटिल माल्कम’ (1974), ‘टाईम बॅंडिट्स’ (1981), ‘द फ्रेंच लेफ्टनंट वुमन’ (1981), ‘द मॅन विथ’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय 2018 साली आलेल्या मेरी पॉपिन्सच्या सिक्वेलमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मोठ्या पडद्याशिवाय वॉर्नरने टीव्हीच्या दुनियेतही बरेच काम केले होते. ‘पेनी ड्रेडफुल,’ ‘रिपर स्ट्रीट,’ ‘स्टार ट्रेक,’ ‘डॉक्टर हू’ हे त्यांचे काही प्रमुख टीव्ही शो होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here