श्रीदेवीची लाडकी कन्या जान्हवी कपूरचे पहिले आयटम सॉंग रिलीझ, दोन दिवसांत दोन कोटी हिट्सचा टप्पा पार


बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि राजकुमार राव हे दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटासाठी खूप चर्चेत आहेत. त्यांचे चाहतेही त्यांच्या येऊ घातलेल्या ‘रुही’ चित्रपटासाठी खूपच उत्साहित आहेत. या चित्रपटात जान्हवी आणि राजकुमार सोबत वरुण शर्मा देखील असणार आहे. नुकताच त्याच्या या चित्रपटातून ‘नदियों पार’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित होता क्षणीच हे गाणे इंटरनेटवर खूपच व्हायरल झाले आहे.

हे गाणे जान्हवी कपूर हिचे आयटम साँग आहे. या चित्रपटात पहिल्याच वेळेस जान्हवी एक आयटम साँग करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. याआधीही कदाचित तुम्ही हे गाणे ऐकले असेल. खरंतर हे गाणे 2004 मध्ये रिलीज झाले होते. तेव्हा देखील या गाण्याने खूपच धमाल केली होती. या गाण्याला आता रेक्रियट केले गेले आहे. शामुर यांनी हे गाणे गायले आहे. यासोबतच रश्मित कौर, आईपी सिंग, आणि सचिन जिगर यांनी गाण्याला कोरस दिले आहे.

रूही या चित्रपटातील नादियों पार हे गाणे 2 मिनिट 27 सेकंदाचे आहे, ज्यामध्ये जान्हवी कपूर हिने डान्स करून सगळ्या प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. तिच्या जबरदस्त मुव्सने तिचे चाहत्यांची तर झोपच उडाली आहे. ती अगदी तिच्या आईसारखी म्हणजे श्रीदेवी सारखी डान्स करते असे सर्वत्र म्हटले जात आहे.

रुही या चित्रपटाला दिनेश विजन यांनी दिग्दर्शित केले आहे. राजकुमार राव आणि दिनेश विजन यांनी याआधी देखील ‘स्त्री’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. स्त्री या चित्रपटात राजकुमार राव हा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर हिने काम केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.