Monday, June 24, 2024

‘या’ कारणामुळे मेकअप आर्टिस्टशीच भांडू लागली जान्हवी कपूर, पाहून अर्जुन कपूरही झाला दंग

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर सध्या तिच्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असते. ती अनेकदा तिचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करते, ज्याला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. नुकताच जान्हवीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची मेकअप आर्टिस्ट रिव्हिरा लिनसोबत भांडताना दिसत आहे. जान्हवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओवर तिचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरनेही प्रतिक्रिया दिली आहे.

खरं तर, या व्हिडिओमध्ये जान्हवी तिच्या मेकअप आर्टिस्टशी भांडत नाहीये, तर भांडणाचा केवळ अभिनय करत आहे. यात दोघींनी ‘बिग बॉस’ सीझन ५ मधील स्पर्धक शोनाली नागराणी आणि पूजा मिश्रा यांच्यातील भांडणाला रिक्रिएट केले आहे. बॅकग्राउंडमध्ये शोनाली आणि पूजाच्या भांडणाचा आवाज येत आहे. तर जान्हवी आणि मेकअप आर्टिस्ट त्याच आवाजावर अभिनय करताना दिसत आहेत. (janhvi kapoor and her makeup artist fight scene recreate arjun kapoor reaction)

अर्जुन कपूरची प्रतिक्रिया
व्हिडिओ शेअर करत जान्हवी कपूरने लिहिले, “मला मदतची गरज आहे, असे तुम्हाला वाटते का?” यावर अर्जुन कपूरने स्पीचलेस इमोजी बनवून ‘हो’ म्हटले आहे. शनाया कपूर प्रतिक्रिया देत लिहिले की, “मी तुझ्यासाठी प्रार्थना करते.” तर फातिमा सना शेखने यावर हसणारे ईमोजी पोस्ट केले आहेत.

जान्हवीचे आगामी चित्रपट
अलीकडेच जान्हवीच्या ‘मिस्टर ऍंड मिसेस माही’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यामध्ये तिची जोडी राजकुमार रावसोबत दिसणार आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबर २०२२ रोजी, सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय जान्हवीकडे ‘गुड लक जेरी’, ‘मिली’, ‘बॉम्बे गर्ल’ आणि ‘दोस्ताना २’ आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा