दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने केला थ्रोबॅक व्हिडिओ शेअर; कोरोना काळात तिला आली सुट्ट्यांची आठवण


सध्या कोरोनाच्या महामारीमुळे असलेले लॉकडाऊन सर्वानाच कंटाळवाणे वाटत आहे. घराच्या चार भिंतींत चोवीस तास राहणारी लोकं त्यांचे बिनधास्त आणि स्वछंदी जीवन आठवून दिलासा घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यासाठी ते त्यांचे जुने फोटो, व्हिडिओ बघून काही काळापुरता दिलासा घेत आहेत. यात सामान्य व्यक्तींपासून ते खास व्यक्तींपर्यंत सर्वच जणं त्यांचे थ्रो बॅक फोटो सोशल मीडियावर टाकताना दिसत आहेत. कलाकार देखील त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओ टाकत असून, लवकरच आपण कोरोनातून बाहेर यावे अशी इच्छा व्यक्त करत आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने देखील नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवीने  तिचे सर्व जुने फोटो आणि छोटे व्हिडिओ एकत्र करून एक व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये तिचे जास्तकरून सर्व सुट्ट्यांचे फोटो असून गोव्यापासून ते अगदी मालदीवपर्यंत सर्वच फोटो यात आहेत. शिवाय व्हिडिओच्या सुरुवातीला तिने अगदी निरागसतेने सुंदर आणि आकर्षक एक्सप्रेशन दिले असून काही फोटोशूटच्या वेळी केलेले व्हिडिओही यात आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला अमेरिकन गायिका फ्रॅंक सिनात्राचे एक गाणे देखील वाजत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले, “थ्रोबॅक, माझा नेहमीच फ्रॅंक सिनात्राचा मूड असतो.” जान्हवीचा हा व्हिडिओ फॅन्ससोबतच कलाकारांना देखील आवडत आहे. चाहत्यांनी लव्ह ईमोजींचा जणू पाऊसच पाडला आहे. मधल्या काही काळापासून सोशल मीडियावर जान्हवी खूप सक्रिय झाली आहे. कोरोनाकाळात जान्हवी सतत तिच्या सुट्ट्यांचे फोटो टाकत असल्याने ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. म्हणून काही काळ ती सोशल मीडियापासून लांब गेली होती.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तिचा ‘रुही’ सिनेमा मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. आता लवकरच जान्हवी ‘गुड लक जेरी’ आणि ‘दोस्ताना २’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.