Saturday, July 27, 2024

ही दोस्ती तुटायची नाय! जावेद अख्तर आणि गुलजार यांची पहिली भेट, वाचा 50 वर्षापूर्वीचा तो रंजक किस्सा

बॉलिवूडमधील अशा काही मैत्री आहेत ज्यांचे उदाहरण आजही दिले जाते, त्यापैकीच जावेद अख्तर आणि गुलजार यांची मैत्री आहे. खूप कमी लोकांना यांच्या मैत्रीबंद्दलचा रंजक किस्सा माहित आहे. गेल्या 50 वर्षापासून ही मेत्री आजही तितकीच पक्की आहे. नुकतंच गुलजार यांनी जावेद अख्तर यांच्या ‘जादुनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन केलं, ज्याचं शीर्षक अख्तर यांच्या जादू या टोपणनावावरून घेतलं आहे. यानंतर दोघांच्या मैत्रीची चर्चा सुरू झाली. जावेद अख्तर आणि गुलजार यांच्या मैत्रीची सुरुवात 1971 मध्ये रमेश सिप्पी यांच्या ‘अंदाज‘ या चित्रपटातून झाली होती. जावेद अख्तर आणि सलीम खान यांना ‘अंदाज’ चित्रपटाची पटकथा लिहिण्याची संधी मिळाली, तर त्याचे संवाद लिहिण्याची जबाबदारी गुलजार यांच्यावर सोपवण्यात आली. या चित्रपटात शम्मी कपूर, हेमा मालिनी, राजेश खन्ना आणि सिमी गरेवाल यांसारखे लेकप्रिय कलाकार मुख्य भूमिका साकारणार होते.

जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी त्यांच्या पुस्तक ‘जादुनामा’ पुस्त प्रदर्शनामध्ये गुलजार यांच्या सोबत मैत्रीचा एक रंजक किस्सा सांगितला होता. त्यांची पहिली भेट कधी झाली आणि कशी या दोघांमध्ये एवढी पक्की मैत्री झाली याबद्दल जावेदजींनी सांगितले की, “एकदा गुलजार साहेब संवाद लिहीत होते आणि आम्ही पटकथा लिहीत होतो. हा चित्रपट हिट झाला आणि गुलजार साहेब आणि मी दोघेही चांगले मित्र झालो. आम्ही अनेकदा भेटत नाही, पण जेव्हा कधी आम्ही भेटतो तेव्हा तासनतास गप्पा मारत असतो, आम्ही अजूनही एकमेकांना पत्र लिहितो. आम्ही काय लिहिलंय आणि एकमेकांना काय वाचलं याबद्दल आम्ही बोलतो. चांगली गोष्ट म्हणजे मला फायदा आहे कारण मला बहुतेक गोष्टी आठवतात आणि त्याला फारसं आठवत नाही.”

जावेद अख्तर यांच्या जादुनामा पुस्तक प्रदर्शानवेळी त्यांचे प्रिय मित्र गुलजार पोहोचले होते, त्यावेळी त्यांनी गुलजारजींचे कौतुक करत त्यांना ‘ईद का चांद’ असं उल्लेखलं होतं. जावेद अख्तरांनी सांगितले की, “माझ्या पुस्त प्रदर्शनासाठी आला आहात तुमचे खूप आभार. तुम्ही देखिल त्या ईदच्या चांद सारखे झाला आहात. चला ते तर वर्षातून निघत असतो मात्र, तुमची तर तीही गॅरंटी नसते. मी गुलजार साहेबांचा खुप आभारी आहे. कारण ते फार काही बाहेर जात नाहीत, मला आनंद आहे की, ते माझ्या पुस्तक प्रर्शनासाठी उपस्थित आहेत.”

JADUNAMA BOOK LONCH

जावेदजी पुढे म्हणाले की, आमच्या मैत्रीमध्ये कधीच प्रतिस्पर्धा लागली नाही. आम्ही नेहमी एकमेकांचा उत्साह वाढवला आहे. भले आमची लेखन शैली वेगळी असली तरी आमच्यामध्ये मात्र, एक गोष्ट समान आहे ती म्हणजे, आम्ही दोघेही खूपच भारी लिहतो. आमची मैत्री कैफी साहब आणि सरदार जाफरी भाई यांच्यासारखी आहे. मी अनेकदा त्यांच्या गाण्यांचे कौतुक करतो जे त्यांनी 20 वर्षापूर्वी लिहिले होते.

JAVED AKHTAR AND GULZAR BOOK LONCH SHOW

गुलजार म्हणाले की, “मी नेहमी जावेदकडे हिंदी भाषाच्या बारीक बारीक गोष्टी शिकण्यासठी मदत घेत असतो, कारण मला भाषेचे ज्ञान नाही. ते म्हणाले की, ‘मी फारसा शिकलेला माणूस नाही. मी कॉलेजमध्ये नापास झालो होतो, जेव्हा मला हिंदीत शब्द कमी पडतात तेव्हा मी जावेद साहेबला हाक मारतो.”

जावे अख्तर यांच्या जादुनामा या पुस्तक प्रदर्शानसोबतच त्यांना आपल्या मैत्रीचे अनेक रंजक किस्से देखिल चाहत्यांना सांगितेल आहेत. आजही त्यांची मैत्री पूर्वीसारखीच घट्ट आहे.(javed akhtar and gulzar become friends afte 50 years raed here)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! ‘द काश्मीर फाईल्स’ फेम अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात, गंभीररित्या जखमी
चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’

हे देखील वाचा