Friday, April 19, 2024

ओबामा आणि शाहजहानची तुलना करणे जावेद अख्तर यांना पडले भलतेच महागात; वादग्रस्त ट्वीटमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

कलाकार आणि त्यांचे वाद हे आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. मनोरंजनसृष्टीतील असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे सतत काहीतरी वक्तव्य किंवा सोशल मीडियावर त्यांचे मतं मांडत असतात. मात्र कधी कधी त्यांचे वक्तव्य आणि मतं चुकीच्या पद्धतीने लोकं घेतात. कधी वक्तव्यच चुकीचे असतात तर, कधी त्यांचा मुद्दा योग्य असतो, मात्र तो मांडण्याची पद्धत चुकते. यापैकी एका कारणामुळे सेलिब्रिटी वाद ओढवून घेतात. कलाकारांचे वादासोबत खूपच जवळचे नाते आहे. असेच सतत वादांमध्ये अडकणारे एक ज्येष्ठ गीतकार म्हणजे जावेद अख्तर. जावेद साहेब जेवढे त्यांच्या सुंदर गीतांसाठी, शायरींसाठी ओळखले जातात, तेवढेच ते त्यांच्या विवादित वक्तव्यांसाठी देखील ओळखले जातात. जावेद अख्तर यांनी पुन्हा सोशल मीडियावर एक ट्वीट केले आहे, ज्यामुळे आता जावेद साहेब ट्रोल होत आहे.

जावेद अख्तर नेहमीच ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. जावेद साहेब यांनी नुकतेच एक ट्वीट करत शाहजहानला ७५ % राजपुतीय म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. “ओबामाचे वडील केनियाचे राहणारे होते. त्यांची एक काकू आजही केनियामध्ये राहते. मात्र ओबामांचा जन्म हा अमेरिकेत झाला आणि तरीही त्यांना राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवायचा अधिकार मिळाला. शाहजहान यांचा जन्म देखील भारतातच झाला. शाहजहानची भारतात जन्म घेणारी पाचवी पिढी होती. त्यांची आई आणि आजी या राजपूत घराण्यातील होत्या. त्यामुळे त्यांचे ७५ % रक्त राजपुती होते. मात्र आजही लोकं त्यांना विदेशी, आक्रमणकरणारे समजतात. (javed akhtar compares obama with shah jahan)

या ट्वीटवर फिल्ममेकर विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांचे मतं मांडत, जावेद अख्तर यांना चुकीचे म्हटले आहे. विवेक रंजन अग्निहोत्री त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले, “जावेद साहेब तुम्ही चुकीचे आहेत. ओबामा यांच्या पालकांनी किंवा आजोबांनी अमेरिकेवर आक्रमण केले नव्हते. जर तुम्ही शाहजहानसोबत ओबामांची तुलना करत असाल, तर ओबामांनी अमेरिकेमध्ये चर्च उद्वस्त नाही केले किंवा ना ही तलवारीच्या धाकाने कोणाचे धर्मपरिवर्तन केले आहे. ओबामा हे अत्याचारी शासक नव्हते. हा एक चुकीचा तर्क आहे.”

विवेक रंजन अग्निहोत्री त्यांच्यासोबतच अनेक नेटकऱ्यांनी आणि काही कलाकारांनी देखील जावेद अख्तर यांना चुकीचे म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’

राहुल- दिशाला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले त्यांच्या घरी; नवदाम्पत्यासह डान्स करून केली ‘ईतकी’ मोठी मागणी

-शोएब इब्राहिमचे वडील ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात दाखल; दीपिका कक्करने केली सासऱ्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना

हे देखील वाचा