Friday, July 5, 2024

किंग खानच्या दिग्दर्शकाच्या घरी तब्बल 9 वर्षांनी हलला पाळणा, पोस्ट शेअर करत म्हणाले…

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान सध्या पठाण चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. तब्बल 4 वर्षानंतर  दमदार पद्धतीने पुनरागमन करुन बॉलिवूडला तारलं आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. पठाण नंतर अभिनेता लवकरच जवान चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. अशातच जवान चित्रपटाचे दिग्दर्शक अटली कुमार यांनी आनंदाची बातमी दिली आहे, त्यांच्या घरी एका चिमुरड्या पहुण्याते आगमन झाले आहे. त्यांची पत्नी प्रिया मोहन आणि अटली कुमार यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.

दाक्षिणात्या इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अटली कुमार  (Atli Kumar) सतत आपल्या कामामुळे ओळखले जातात मात्र, या वेळेस त्यांनी आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्युज दिली आहे. “आई-वडील होण्याची भावना वेगळीच आहे. आम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. पालकत्वाचा प्रवास आजपासून सुरू होत आहे,” असं म्हणत त्यांनी आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अटली कुमार यांनी प्रिया मोहन (Priya Mohan) यांच्यासोबत 2014 साली विवाह केला असून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात कोली होती. लग्नाच्या तब्बल 9 वर्षानंतर त्यांच्या घरात चिमुकल्याचा आवाज ऐकायला मिळणार आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून सेलिब्रिटींनीदेखिल त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

View this post on Instagram

 

अटली कुमार दिग्दर्शित जावान (Jawan) चित्रपटामध्ये शाहरुख खान सोबत अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि विजय सेतुपति देखिल महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. जवान चित्रपट येत्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
लाइमलाईटपासून दूर नदी किनारी ध्यान करताना दिसली अनुष्का शर्मा, ऋषिकेशमध्ये कुटुंबासोबत घालवते वेळ
जगभरात वाजतोय ‘पठाण’चा डंका मात्र, जभरातील कमाईच्या बाबतीत ‘हा’ भारतीय चित्रपट अव्वल स्थानी

हे देखील वाचा