Saturday, June 29, 2024

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचं नवीन गाणं रिलीज पूर्वीच झालं लिक; पाहा व्हिडिओ

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची जबरदस्त हवा आहे. शाहरुख खान हा सध्या त्याच्या ‘जवान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवानचा टिझर रिलिज झाल्यानंतर चाहत्यांची उत्सूकता आणखीनच वाढली. ‘पठाण’ चित्रपटातनंतर शाहरुख खान आता ‘जवान’ चित्रपटात ॲक्शन भूमिकेत दिसणार आहे. ‘जवान’ टिझरनंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘जिंदा बंधा’हे गाणं रिलिज केलं ज्यानंतर तर शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपट सुपरहिट असल्यांचं सांगत सोशल मिडियावर धुमाकूळ घातला होता. इतकेच नव्हेतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील हे गाणं आवडलं.

‘जवान’चा  (jawan)ट्रेलर आणि ‘जिंदा बंदा’ (zinda banda) या पहिल्या गाण्याला लोकांचे भरभरून प्रेम मिळालं आता जवानच्या ‘दिल तेरे संग जोडीया’ या दुसऱ्या गाण्याचा व्हिडिओ लीक झाला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत शाहरुख खान (shah rukh khan)  नयनतारासोबत त्याच्या रोमँटिक स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओत नयनतारा शाहरुख खानसोबत समुद्राच्या मध्यभागी एका जहाजावर रोमान्स करतांना दिसत आहे. हे गाणे या महिन्यात रिलीज होणार आहे. जे अरिजित सिंग (arijit singh )आणि शिल्पा राव  ( shilpa rao)यांनी गायलं आहे. तर फराह खानने या गाण्याला कोरिओग्राफ केले आहे. पण हे गाणं रिलीजचा आधीच लिक झालं आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटात शाहरुख आणि नयनतारा (nayanthara) ही जोडी पहिल्यांदाच स्क्रिन शेयर करणार आहेत तर विजय सेतुपती (vijay sethupathi), रिद्धी डोगरा आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहे.(jawan movie second song dil tere sang jodiyaan by arijit singh video leaked)

हे देखील वाचा